एसटीची सेवा बंद होणार? कर्मचारी पुन्हा आक्रमक, आता काय आहे मागणी?

सप्टेंबर 2023 मध्ये महागाई भत्याची, घरभाडे भत्याची आणि वार्षिक वेतनवाढीच्या उर्वरित रक्कम देणार असा अनेक मागण्या (demands) एसटी कर्मचाऱ्यांच्या 15 दिवसात पूर्ण होणार होते. मात्र आता 4 महिने उलटून गेले अद्याप बैठक झालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या 15 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनांची बैठक घेऊन निर्णय घेणे मान्य केले होते. मात्र अद्याप परिस्थिती जैसे थे आहे. कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलनानंतरही मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकबाकी या मागण्यांवर मान्यताप्राप्त संघटनांबाबत चर्चा करून 60 दिवसांत अहवाल सरकारला सादर करण्याचे समितीने मान्य केले आहे. मात्र 60 दिवसांऐवजी चार महिने उलटून गेले तरी अद्याप अहवाल सादर झालेला नाही. त्यामुळे आता उपोषण सुरुच राहणार. तसेच या प्रलंबित मागण्यापूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार अशी भूमिका महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी सांगितले.

यासह सर्व प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या सोडवणूकीसाठी राज्यासह अकोल्यातही संघटनेने पुन्हा 13 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलन दरमान्य मागण्या (demands) पूर्ण न झाल्यास आता एस टी कर्मचारी पुन्हा स्टेरिंग छोडो आंदोलनाच्या पवित्रा घेणार असल्याचं चिन्ह दिसून येत आहेत.

सर्व प्रलंबित आर्थिक मागण्या पूर्ण करण्यासाठी 13 फेब्रुवारीपासून आपत्कालीन मदत सुरू करण्यात आली आहे. राज्य विभागीय पातळीवर उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. परंतु या आंदोलनाची दखल न घेतल्यास आगार पातळीवरील कर्मचारी उपोषणाला बसून काम बंद आंदोलन सुरु करतील. यामुळे एसटी सेवा बंद होणार असे महाराष्ट्र एस.टी. असे कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *