खानदेशी कढई खिचडी

सतत त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. अशावेळी रोज वेगळं आणि तरीही चविष्ट काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. विकेंडला तर काहीतरी वेगळं आणि चमचमीत हवं असतं. अशातच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अस्सल खान्देशी कढई खिचडी, चला तर पाहुयात याची सोपी मराठी रेसिपी…

खानदेशी कढई खिचडी साहित्य

१-२ टीस्पून गरम मसाला
१-२ टीस्पून तिखट
१/४ टीस्पून हळद
१-२ टीस्पून सुक्या खोबऱ्याचा किस
१ टेबलस्पुन कोथिंबीर
चविनुसार मीठ (salt)
२-३ टेबलस्पुन तेल
आवश्यकते नुसार गरम पाणी
पापड, पापड्या, आंब्याचे लोणचे
५० ग्रॅम मसुर डाळ, मुगडाळ, तुरडाळ मिक्स
१ कांदा
१ टोमॅटो
१०० ग्रॅम तांदुळ
१ टेबलस्पुन कोथिंबीर
१-२ बटाटे
३० ग्रॅम शेंगदाणे
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून जीरे
४-५ लसुणाच्या पाकळया
७-८ कडिपत्यांची पाने
१/४ टीस्पून किसलेले आले
१ पिंच हिंग

खानदेशी कढई खिचडी कृती

स्टेप १

कढई खिचडी साठी लागणारे साहित्य प्लेटमध्ये काढुन ठेवा मिक्स डाळी १५-२० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा
तांदुळही धुवुन पाण्यात भिजत ठेवा कांदा, टोमॅटो, कोथिंबिर बारीक चिरून ठेवा. बटाट्याच्या लहान फोडी करून ठेवा

स्टेप २

लोखंडी कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरे, बारीक चिरलेला लसुण, शेंगदाणे व कांदा, कडिपत्ता मिक्स करून कांदा लालसर होईपर्यत परता नंतर त्यात आल्याचा किस, हिंग, बारीक चिरलेले टोमॅटो टाकुन परता त्यातच तिखट हळद गरममसाला व बटाट्याच्या बारीक फोडी, खोबर्याचा किस मिक्स करून परता थोडा वेळा शिजवा

स्टेप ३

नंतर त्यात गरम पाणी टाका व उकळी काढा.

स्टेप ४

पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात भिजलेल्या मिक्स डाळी, व भिजलेले तांदुळ व मीठ (salt) मिक्स करा व खिचडी शिजु द्या.

स्टेप ५

पाणी आटत आल्यावर कढईवर झाकण ठेवा व गॅस स्लो करून खिचडी शिजु द्या थोडी कोथिंबीर चिरून टाका.

स्टेप ६

आपली खानदेशी कढई खिचडी खाण्यासाठी रेडी.

हेही वाचा >> वऱ्हाडी सँडविच; असा ब्रेकफास्ट कधी केला नसेल, या स्पेशल सँडविचची रेसिपी नक्की ट्राय करा

स्टेप ७

गरमागरम डाळ तांदळाची खिचडी प्लेटमध्ये सर्व्ह करा वरून कोथिंबिर पेरून सोबत पापड पापड्या व आंब्याचे लोणचे देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *