‘झलक दिखला जा’च्या सेटवर संगीता आणि चहलमध्ये रंगला ‘WWE’ सामना

(sports news) भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. युजवेंद्र चहलला गेल्या अनेक दिवसांपासून भारताकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही, मात्र त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाट युजवेंद्र चहलला खांद्यावर घेऊन गोल-गोल फिरवताना दिसत आहे. या व्हिडीओतील युजवेंद्र चहलची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने यंदाच्या सीझनमध्ये ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या डान्स रिॲलिटी शोमध्ये युजवेंद्र चहलने पत्नी धनश्री वर्माला खूप सपोर्ट केला आहे. युजवेंद्र चहलनेही अनेकवेळा चाहत्यांना पत्नी धनश्री वर्माला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाट ‘झलक दिखला जा’च्या सेटवर मस्तीच्या मूडमध्ये दिसली.

‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोच्या पार्टीदरम्यान, भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाटने टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलला खांद्यावर उचलून गोल-गोल फिरवले. भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाटने युजवेंद्र चहलला अशा प्रकारे फिरवले की, ज्यामुळे त्याला चक्कर येताना दिसली. यानंतर युजवेंद्र चहलने हसत संगीता फोगटला थांबण्याचा इशारा केला. (sports news)

या सीझनमध्ये संगीता फोगाटने ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. मात्र, संगीता फोगाट यापूर्वीच ‘झलक दिखला जा’ शोमधून बाहेर पडली आहे. संगीता फोगाट ही ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाची पत्नी आहे. संगीता फोगाट ही राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती आणि महिला कुस्तीपटू गीता फोगाटची बहीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *