अस्वच्छ मासिक पाळीमुळे वाढतो वंध्यत्वचा धोका
आजही आपल्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांना मेंस्ट्रुअल कप आणि टॅम्पन्स बद्दल माहिती नाही. बहुतांश महिलांना तर अस्वच्छ पीरियड्स म्हणजे काय याचीही माहितीही नसते.
प्रत्येक महिला आणि मुलीला मासिक पाळीच्या स्वच्छतेची जाणीव व्हावी या उद्देशाने २८ मे रोजी जागतिक पातळीवर मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो.आज आपण मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची काळजी न घेतल्याने कोणत्या आजारांचा धोका वाढू शकतो, तसेच, मासिक पाळीची स्वच्छता राखण्यासाठी कोणत्या टिप्स पाळल्या पाहिजेत? याबद्दल जाणून घेऊया.
यूटीआय (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) हा एक मूत्रमार्गाचा संसर्ग आहे जो मूत्रमार्ग, मूत्राशय आणि मूत्रपिंडांवर गंभीरपणे परिणाम करू शकतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांना यूटीआय होण्याची अधिक शक्यता असते कारण त्यांचा मूत्रमार्ग लहान असल्याने बॅक्टेरियाला मूत्राशयात प्रवेश करणे सोपे होते.पेल्विक इंफ्लामेटरी हा गर्भाशय, योनी आणि फॅलोपियन नलिका यांसारख्या पुनरुत्पादक अवयवांचा संसर्ग आहे. यामुळे वेदना, ताप आणि वंध्यत्व होऊ शकते.
योनीतून बॅक्टेरिया गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब किंवा अंडाशयात जातात तेव्हा PID होऊ शकतो. टॅम्पन किंवा मासिक पाळीचा कप वारंवार बदलत नसल्यास हे होण्याची शक्यता जास्त असते.
बॅक्टेरियल योनिओसिस हा एक सामान्य योनीमार्गाचा संसर्ग आहे. योनीमध्ये काही सामान्य जीवाणू जास्त प्रमाणात वाढल्यास बॅक्टेरियाचे असंतुलन होते. या स्थितीमुळे पांढरा किंवा तपकिरी दुर्गंधी द्रव बाहेर पडतो.
मासिक पाळीची स्वच्छता राखण्यासाठी या सोप्या टिप्सचे अनुसरण करणे फायदेशीर ठरेल.
सामान्य पाण्याचा वापर करून दररोज योनी स्वच्छ करा. यासाठी साबण, कोणतेही केमिकल आधारित लिक्विड अशा कोणत्याही इतर पदार्थाचा वापर करणे टाळावे, कारण यामुळे योनीमध्ये असलेल्या बॅक्टेरियाचे नैसर्गिक संतुलन बिघडू शकते.
दर 4-8 तासांनी पॅड किंवा टॅम्पॉन बदला. रक्तस्त्राव तीव्र असल्यास, अधिक वेळा बदला.
टॉयलेट वापरल्यानंतर तुमची योनी पुढंपासून मागपर्यंत पुसून टाका.
कॉटन अंडरवेअर घाला जेणेकरून हवा तुमच्या त्वचेतून सहज आरपार जाऊ शकेल.
अशी मासिक पाळीची उत्पादने निवडा जी सुगंधमुक्त आणि हायपोअलर्जेनिक असतील.
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.