कोल्हापूर : नदीकाठची गावे, शहरे यांचे आरोग्य धोक्यात

नदीकाठची गावे, शहरे यामधील दवाखान्यांतून जे सांडपाणी (Sewage) तयार होते, त्यावर प्रक्रिया आवश्यक असते. या सांडपाण्यात जैवकचऱ्यातील घटक, शरीरातील पाण्याचे अन्य घटक असतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासाठी नियमही केले असून, ते सर्व दवाखान्यांना बंधनकारक आहेत. १०० बेडपेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या दवाखान्यांनी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. पण, नदीकाठच्या गावांत दवाखाने, आरोग्य उपकेंद्रे, खासगी दवाखाने आहेत, त्यांच्या सांडपाण्याचे प्रमाण प्रतिदिन १० हजार ६२५ लिटर आहे. यातील किती लिटरवर प्रक्रिया होते, याची आकडेवारी उपलब्ध नाही. पण, दवाखान्यांतील सांडपाणी नदीत मिसळणे धोकादायक आहे.

महापालिका क्षेत्रात जे १०० बेडपेक्षा जास्त क्षमतेचे चार दवाखाने आहेत, त्यापेक्षा कमी बेड असणारे दवाखानेही आहेत. मोठ्या दवाखान्यांना सांडपाणी (Sewage) प्रक्रिया प्रकल्प बसविणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांनी ते बसविले आहेत. मात्र, शहरातील अन्य दवाखाने, नर्सिंग होम आदी ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प नाहीत. या दवाखान्यांतून जे सांडपाणी बाहेर पडते, ते गटारी, नाले यांच्याद्वारे प्रक्रिया प्रकल्पात जाते. दवाखान्यांच्या सांडपाण्यात जैववैद्यकीय द्रवकचरा असतो. नदीच्या पाण्यात जर असे सांडपाणी गेले तर हे दूषित पाणी मानवी शरीराला अपायकारक आहे. यामुळे त्वचारोगांबरोबरच अन्य गंभीर अपायही होतात.

तपासणी करणारी यंत्रणा आवश्यक

१०० बेडपेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या दवाखान्यांचे प्रक्रिया प्रकल्प सुरू आहेत का, हे पाहण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे हे प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहेत का, हे तपासणेआवश्यक आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण प्रदीर्घ काळ सुरू आहे. नदी प्रदूषित होण्यामागे आपणच कारण आहोत. तिचे प्रदूषण रोखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *