कोल्हापुरात भाजपचं कमळ कोमेजलं

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला असून भाजपच्या सत्यजित कदम यांचा त्यांनी पराभूत केलं.

या निवडणुकीत जयश्री जाधव यांनी १८,९०१ मतांनी विजय मिळवत सत्यजित कदम यांचा पराभव केला.

कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्या महिला आमदार तसेच नगरसेवक असताना महापौर होण्याचा असा दुहेरी मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या आमदार ठरल्या.
विजयी उमेदवार जयश्री जाधव यांनी माध्यमांशी बोलताना, ‘पण, आज अण्णा सोबत नाहीत याची खंत आहे. त्यांची पावलोपावली आठवण येते. कोल्हापूरच्या जनतेने त्यांच्या माघारी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. अण्णांनी जे पेरलं ते चांगलं उगवलं.’ असे सांगता त्या भावुक झाल्या होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि माझ्या जनतेला माझ्या विजयाचे श्रेय देईन. जनतेने भरभरून मते दिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे. याचे श्रेय महाविकास आघाडीला आहे. कोल्हापुरच्या स्वाभिमान जनतेने न्याय दिला आहे. या निवडणुकीत भाजपचे संस्कार कमी पडलेत, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *