अघोरी कृत्याने शहरात माजली खळबळ
येथील एका स्थानिक लोकप्रतिनिधीच्या निवासस्थान परिसरातील एका झाडाला लोकप्रतिनिधीसह त्यांच्या कुटुंबियांतील सदस्यांच्या फोटोंना काळी बाहुली लिंबूसह लोखंडी खिळे केलेल्या अघोरी कृत्याने शहरात खळबळ माजली आहे.
आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या राजकीय आघाडीने जाहीर निषेध (prohibition) केल्याने अघोरी कृत्याचा असंतोष पसरला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अमावस्या होती. यामुळे अघोरी कृत्याची शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. संबंधित लोकप्रतिनिधीच्या निवासस्थान परिसरात बाभळीचे झाड आहे. झाडाला सर्व कुटूंबियाच्या फोटोंना काळी बाहुली, हळद कुंकू लावलेला तीनधारी रसरसरीत लिंबू आणि या तीन वस्तू एकत्र करून लोखंडी खिळ्याने झाडाला ठोकलेले आहेत.
या कृत्याचा जाहीर निषेध (prohibition) संबधित राजकीय आघाडीने सोशल मीडियावर केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने कार्यकर्त्यानी घटनास्थळी गर्दी केली. दरम्यान, निवडणूकीत दोन्ही आघाड्यांमध्ये अघोरी कृत्याचा वापर केला जातो. हा प्रकार वडगाववासियासाठी नवीन नाही असा गौफ्यस्फोट दोन्ही आघाडीशी जवळीक असलेल्या एका लोकप्रिनिधींनी केला. जग गेले चंद्रावर मात्र पेठवडगावकर अजून ‘लिंब’वावर अशी खिल्ली नेटकरी सोशल मीडियावर उडविली आहे.