ओमायक्रॉनच्या धास्तीमुळे सोन्याचे दर वाढले
सराफा बाजारात सोने दरात तेजी कायम आहे. ओमायक्रॉनच्या (omicron) धास्तीमुळे सराफा बाजारात सोन्याचा प्रति तोळा भाव ४८ हजार रुपयांवर (प्रति १० ग्रॅम) पोहोचला. आज बुधवारी सोन्याच्या दरात वाढ होऊन ते ४८,१२६ रुपयांवर गेले. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.ओमायक्रॉनच्या धास्तीमुळे सोन्याचे दर वाढले.इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,१२६ रुपयांवर खुला झाला. काल मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचा दर ४७,,९६७ रुपयांवर बंद झाला होता. आज त्यात काही प्रमाणात तेजी आली. २३ कॅरेट सोन्याचा दर ४७,९३३ रुपये आहे. तर २२ कॅरेट सोने ४४,०८३ रुपये, १८ कॅरेट सोने ३६,०९५ आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २८,१५४ रुपये आहे. चांदीचा प्रति किलो दर ६१,६५८ रुपये आहे. काल चांदीचा दर ६१,४९६ रुपयांवर बंद झाला होता. (हे बुधवार दि. ५ जानेवारी दुपारपर्यंतचे अपडेटेड दर आहेत)सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.