राहुल गांधींनी साधला भाजपवर निशाना

मुस्लिम महिलांची बदनामी करणाऱ्या बुली बाई अ‍ॅप प्रकरणी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. एका वृत्ताचा हवाला देत ‘बुली बाई अ‍ॅप’ला मदत करणारी टेक फॉगही भाजपला मदत करणारी कंपनी असल्‍याचा आरोपही त्‍यांनी ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून केला.

राहुल गांधी यांनी ट्‍विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील आरोपचे वय समजल्‍यानंतर संपूर्ण देश प्रश्‍न विचारतोय की, एवढा व्‍देष येतो कोठून? खर तर भाजपने देभरात व्‍देष निर्माण होतील असे अनेक कारखाने काढले आहेत. टेकफॉग हा यातील एक कारखाना आहे.टेकफॉक’संदर्भात काँग्रेसने म्‍हटलं आहे की, भारतीय जनता पक्ष हा इंटरनेटवरुन टेक फॉगच्‍या माध्‍यामून काही विशिष्‍ट समुदाय आणि महिला विशेषत: पत्रकार महिलांसंदर्भात अत्‍यंत आक्षेपार्ह अशी विधाने करत असतो. मीडिया रिपोर्ट नुसार टेक कॉग नावाच्‍या ॲपचा वापर हा दक्षिणात्‍य विचारधारेचा प्रसार करण्‍यासाठी केला जात आहे.बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला आसाम मधून दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ ( IFSO) च्या स्पेशल सेलने अटक केली होती. या प्रकरणात एका आरोपीस उत्तराखंड येथून मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली होती. मयांक रावत असे या आरोपीचे नाव असून तो इंजिनिअर आहे. बुली बाई अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम समुदायातील महिलांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन त्यांची बोली लावली जात असल्‍याचा प्रकार उडकीस आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *