कोल्हापूर : गदिमा, बाबुजी आणि मंगेशकर यांचा अमृतसंचय

आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील प्रत्येक रंग गदिमा, बाबुजी आणि मंगेशकर यांच्या बालगीते, भक्तिगीते, चित्रपट गीतांमधून साकारले आहेत. त्यांच्या प्रत्येक गीतातून शब्दांमधील बळ, शब्दांचे महत्त्व आणि किमयेचे महत्त्व उलगडते. त्यामुळेच त्यांची गाणी अजरामर आहेत. याच अविस्मरणीय आणि अवीट गोडीच्या गाण्यांचा अमृतसंचय दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित सांगीतिक कार्यक्रमात ( musical event) अनुभवता येणार आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे शनिवारी (दि. 30) दुपारी 3. 30 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दै. ‘पुढारी’चे वाचक आणि कस्तुरी क्लब सातत्याने दर्जेदार निर्मितीमूल्य असलेल्या कार्यक्रमांची शृंखला आपल्या वाचक सभासदांसाठी राबवत असते. यामधील ही एक हटके प्रस्तुती असणार आहे.

कार्यक्रमात ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर (गदिमा), प्रख्यात संगीतकार सुधीर फडके (बाबुजी) आणि साक्षात सरस्वती ज्या कुटुंबात वास करते असे मंगेशकर कुटुंब असे समीकरण असून याद्वारे रसिकांच्या मनातील याच आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. गदिमांच्या काही निवडक गीतांच्या जन्माची कथा, त्यांच्या संगीताची कहाणी आणि गायकीचे किस्से खुद्द गदिमांचे सुपुत्र आनंद माडगुळकर आणि मंगेशकर कुटुंबातील गायिका डॉ. राधा मंगेशकर रसिकांना सांगणार आहेत.

संगीत रजनीमध्ये गदिमांनी लिहिलेली गाणी त्या गीतांना संगीतबद्ध बाबुजींनी केली आहेत आणि त्यांना आवाज मंगेशकर कुटुंबीयांचा आहे, असा दुग्धशर्करा योग घेऊन हा कार्यक्रम सादर होणार आहे. कार्यक्रमात डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर ही गायक मंडळी गाणी सादर करणार असून त्यांना प्रसन्न बाम, अमेय ठाकूर-देसाई, सिद्धार्थ कदम, झंकार कानडे, प्रणव हरिदास हे नामवंत वादक साथसंगत करणार आहेत.

कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमात दै. ‘पुढारी’चे वाचक, कस्तुरी क्लब सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आहे. कार्यक्रमासाठी ( musical event) मोफत सन्मानिका मिळण्याचे ठिकाण टोमॅटो एफएम कार्यालय, वसंत प्लाझा, 5 वा मजला येथे तसेच हॉटेल विश्व, वामन गेस्ट हाऊससमोर कोल्हापूर येथे आजपासून दि. 26 रोजी सकाळी 11 ते 6 यावेळेत उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 8483926989, 9096853977.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *