कढीपत्ता चेहाराही खुलवतो;

कढीपत्त्याचा वापर भाजी, डाळ, आमटी आणि वेग-वेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण चव वाढवणारा हा कढीपत्ता औषधीही आहे.अपचन, अतिसार, उल्टी, पोटदुखी, मधुमेह अशा उपचारांसाठी वापर करतात. कढीपत्ता त्वचेचे आजारांवरही उपयुक्त आहे. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरला जातो.

कढीपत्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिबॅक्टेरीयल गुण असतात जे त्वचेचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी मदत करतात. कढीपत्ता चेहऱ्यावरील पिंपल्स , पुरळ आणि डाग यावरही उपयुक्त आहे. कढीपत्ता सर्व प्रकारच्या त्वचांना उपयुक्त आहे. चेहऱ्यावर याचा वापर केल्यावर त्वचा मॉश्चराइज राहते. कढीपत्त्या मुळे चेहऱ्यावर तजेला येतो.कढीपत्ता आणि मुलतानी मातीचा पॅक : कढीपत्ता बारीक करून त्या मध्ये मुलतानी माती घाला. या पेस्ट मध्ये एक चमचा गुलाबजल घालून चेहऱ्यावर २० मिनिटं लावा. या पॅक मुळे त्वचा मुलायम आणि चांगली दिसेल.
कढीपत्ता आणि लिंबूचा पॅक: कढी पत्ता आणि लिंबूचा पॅक बनवण्यासाठी २५-३० कढीपत्त्याची पाने धुवून बारीक करुन त्यात एक चमचा लिंबूचा रस घाला. तयार झालेल्या पेस्टला १५ मिनिट चेहऱ्याला लावून कोमट गरम पाण्याने धुवून घ्या. जर चेहऱ्यावर पुरळ किंवा जखम असतील तर हा पॅक वापरू नका.
कढीपत्ता आणि हळदीचा पॅक : तेलकट त्वचेसाठी हा पॅक खूप प्रभावी आहे. कढीपत्ता बारीक करुन त्यामध्ये हळद आणि गुलाबजल काही थेंब घालून पॅक तयार करून चेहऱ्यावर लावा . हळद चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स घालवण्यास मदत करेल. त्याच बरोबर त्वचेचे सौंदर्यही खुलेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *