वारणा दूध संघ दिवाळीसाठी देणार तब्बल ….कोटी 63 लाख रुपये : आ. डॉ. विनय कोरे
येथील वारणा सहकारी दूध संघामार्फत दिवाळीसाठी दूध उत्पादकांना (manufacturers) फरक बिल, दूध बिल, कामगारांना पगार व बोनस असे तब्बल 54 कोटी 63 लाख रुपये देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी मंगळवारी केली.
दूध संघाच्या इतिहासात प्रथमच दीपावलीनिमित्ताने दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी प्रतिलिटर 2 रुपये 30 पैसे इतके उच्चांकी फरक बिल, दूध बिल, कामगारांचा बोनस जमा केले आहे. परिसरातील अंदाजे दीड लाख जनावरांना मोफत लम्पी प्रतिबंध लस दिली आहे. संघाच्या अमृत पशुधन सुरक्षा कवच योजनेतून सुमारे 30 लाख रुपयांचा लाभ उत्पादकांना(manufacturers) दिला आहे. तसेच बाजारात वारणाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली असून, राज्य तसेच राज्याबाहेरील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे व विक्रीत वाढ झाल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.
संघाची सुमारे 1100 कोटींची आर्थिक उलाढाल झाली असून, या वर्षात अनेक प्रकल्प संघाने हाती घेतले आहेत. मुख्य दुग्धालय विस्तारीकरण प्रकल्प, कॅडबरीकडील स्टॅमिना प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दूध संघाशी संलग्न असणार्या तात्यासाहेब कोरे दूध-साखर वाहतूक संस्था, सावित्री महिला औद्योगिक संस्था, अमृत सेवक पतसंस्था व डॉ. आर. ए. पाटील पतसंस्थेच्या कर्मचार्यांना एकाचवेळी बोनस देण्यात येणार आहे, असे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, मुख्य अकौंट्स मॅनेजर सुधीर कामेरीकर, अकौंट्स ऑफिसर प्रवीण शेलार, फॅक्टरी मॅनेजर श्रीधर बुधाले, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, मार्केटिंग अधिकारी अनिल हेर्ले, आर. व्ही. देसाई उपस्थित होते.