आरंभ फाउंडेशनने वृक्षारोपण करून केले नवीन वर्षाचे स्वागत.

आरंभ फाउंडेशनने वृक्षारोपण करून केले नवीन वर्षाचे स्वागत.
—————————————-
पत्रकार:- नामदेव निर्मळे

नवीन वर्षामध्ये नवी दिशा, नवा संकल्प करून प्रत्येक जण सुरुवात करत असतो.
आरंभ फाउंडेशन सैनिक टाकळी टीमने घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रम येथे वृक्षारोपण करून नवीन वर्षातही जोमाने वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला.
आरंभ फाउंडेशनच्या अध्यक्षा वैष्णवी पाटील म्हणाल्या, “आश्रमासाठी नैसर्गिक वातावरण, किचनमध्ये उपयोगी, फळांची, दुर्मिळ प्रजातीची, जास्त सावली देणारी अशी झाडे लावत आहोत. आश्रमने या अगोदरही दिलेल्या झाडांचे संगोपन चांगले केले आहे आणि आता त्याला फळही लागत आहेत हे पाहून आनंद होत आहे . ”
आश्रमच्या संचालिका सौ. पूर्वा पुजारी सर्वांचे आभार मानत म्हणाल्या, “वैष्णवी पाटील यांनी 19 आणि 21 च्या महापुरात हे आश्रमासाठी जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता केली आहे . आरंभ फाउंडेशने वृक्षारोपण करून नवीन वर्षाचा केलेला आरंभ संगोपनाची जिम्मेदारी घेत आहोत.”
आरंभ फाउंडेशन अनेक वर्षापासून लाखोंच्यावर बीज संकलन, बीजदान ,रोपे तयार करणे, शेतकरी बांधवांना , संगोपन करू इच्छिणाऱ्यांना हजारोंच्यावर वृक्षदान ,वृक्षारोपण ,वृक्ष संवर्धन कार्य केले आणि करत आहे तसेच सामाजिक कार्य ही करत आहे. आंबा ,करंज ,जांभूळ ,पेरू, सीताफळ, कढीपत्ता, चिंच, बदाम ,सीताअशोक, शेवगा, पुत्रजीवा अशा अनेक देशी झाडांचे आरंभ फाउंडेशन सैनिक टाकळी टीम मधील साहिल वासमकर, कृष्णात पाटील शिवराज जाधव ,गणेश जाधव ,सिद्धेश गायकवाड ,सौरभ गायकवाड, देवराज पाटील, सई गायकवाड ,अर्चिता गायकवाड ,वैष्णवी पाटील,जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक बाबासाहेब पुजारी, पूर्वा पुजारी आश्रमातील वृद्धजन यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *