टाकळीवाडी मध्ये गारपीट, वारा, मुसळधार वळवाचा पाऊस, शेतकरी सुखावला
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका :-शिरोळ सुमारे पहाटे २ वाजून 45 मिनिटांनी जोराचा पाऊस व गारपीट होऊ लागली. सध्या दूधगंगा नदीपात्रामध्ये पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली होती. अवकाळी पाऊस मुळे शेतकरी सुखावला आहे.
सुमारे दीड तास पाऊस चालू होता. शेती पावसामुळे गार झाली. पिकांना एक नवजीवन मिळाले आहे .याचा आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पिकांना भरपूर पाण्याची आवश्यकता असते.
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळालेला आहे. दूधगंगा नदी असून सुद्धा सध्या दुष्काळी भागाप्रमाणे जनजीवन दिसून येत होते. निसर्ग कुठेतरी शेतकऱ्याच्या कामी आला असे गौरव शेतकऱ्यांच्या तोंडातून येत आहे. (local news)