आम. हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी ठिकठिकाणी साजरा
(political news) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम. हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळी महाद्वारातून अंबाबाईची महाआरती करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्यावरील ईडीची पिडा टळू दे, त्यांच्यावर आलेली संकटे दूर होऊ देत, असे साकडे घातले.
सकाळी आठ वाजल्यापासून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महाद्वाररोड येथे जमत होते. 8 वाजून 45 मिनिटांनी आरतीस सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अॅड. गुलाबराव घोरपडे, आदिल फरास, राजेश लाटकर, अजित राऊत, जहिदा मुजावर, सुनील देसाई, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, विनायक फाळके, विक्रम जरग, सुहास साळोखे, फिरोज सरगूर, रमेश पोवार, महेश बराले आदी उपस्थित होते.
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील बिरदेव मंदिरात कार्यकर्त्यांच्या वतीने महाआरती करण्यात आली. यावेळी अनिल साळोखे यांच्यासह प्रदीप झांबरे, शहाजी जठार, सुनिल साळोखे, चंद्रकांन नेर्ले, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.
‘गोकुळ’मध्ये वृक्षारोपण
गोकुळतर्फे ताराबाई पार्क येथील कार्यालय आवारात अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करून मुश्रीफ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. (political news)
गेल्या 25 वर्षांपासून मुश्रीफ, रुग्णांवर चांगले उपचार व्हावे, यासाठी काम करत आहेत. त्यातून समाज घटकांशी त्यांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे, असे पाटील म्हणाले. कोरफड, अडुळसा, शतावरी, हळद, तुळस, गुळवेल, कडुलिंब, लिंबू आदी रोपे लावण्यात आली. यावेळी जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, एस. आर. पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते.
ब्लँकेट वाटप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फिरस्त्यांना आझाद चौकामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे, बाळासाहेब देशमुख, शिरीष देसाई, यासिन मुजावर, नंदकुमार गोंधळी आदी उपस्थित होते.
उचगाव (ता. करवीर) येथील हेल्पर्स ऑफ हँडिकॅप प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथील गरीब लोकांना चादर तसेच मुलांना कपडे वाटप करण्यात आले.