IPL खेळणाऱ्या भारतीय खेळाडूसाठी आली मोठी बातमी!
(sports news) भारतीय खेळाडू सध्या आयपीएलच्या १६व्या हंगामात खेळत आहेत. आयपीएल २०२३ ही २८ मे पर्यंत सुरू असेल. त्यानंतर भारतीय खेळाडूंना जूनच्या पहिल्या आठवड्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. ही लढत इंग्लंडमध्ये ७ जूनपासून होणार आहे.
WTC फायनल खेळणारे भारताचे सर्व खेळाडू सध्या आयपीएल टी-२० खेळत आहेत. अशात ऑस्ट्रेलियाने फायनल मॅचसाठीचा संघ देखील जाहीर केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फायनलसाठी १७ जणांचा संघ जाहीर केला आहे. यात डेव्हिड वॉर्नरचा देखील समावेश आहे तर ऑलराउंडर मिचेल मार्शचा चार वर्षानंतर कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
मिशेल मार्श दुखापतीमुळे सातत्याने संघाबाहेर होता. यामुळे त्याला २०२१च्या टी-२० वर्ल्डकपआधीच कसोटी संघातून बाहेर करण्यात आले. आता ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी तो पुन्हा संघात आला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरीच्या जोरावर तसेच भारताविरुद्ध झालेल्या मर्यादीत षटकांच्या मालिकेतील कामगिरीमुळे निवड समितीने त्याला कसोटी संघात स्थान दिले आहे.
राष्ट्रीय निवड समितीने फायनलसाठी संघ निवडता गेल्या २ वर्षापासून सातत्यापूर्ण कामगिरीचा विचार केला आहे. म्हणूनच यात डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्क हॅरिस यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने संघात चार जलद गोलंदाजांचा समावेश केला आहे, यात कर्णधार पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड, स्कॉट बोलेंड हे खेळाडू आहेत. ऑलराउंडर म्हणून कॅमरून ग्रीन, मिशेल मार्श या जोडीसह नाथन लियोन आणि टॉड मर्फी या दोघांना स्थान दिले गेले आहे. (sports news)
भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाचा २-१ने पराभव करत WTC फायनलमध्ये स्थान पक्के केले होते. आता ही लढत इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होईल. भारताने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय. पहिल्या WTC फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडने पराभव केला होता.
WTC फायनलसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलेंड, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मिशेल मार्श, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.