अश्विनच्या कृतीने डोकं चक्रावलं; थर्ड अंपायरच्या निर्णयालाच दिले आव्हान

(sports news) रविचंद्रन अश्विन बॉलिंग करताना फलंदाज नेहमी सर्तक असतो. फॅन्सही अलर्ट असतात. अलर्ट यासाठी कारण तो गोलंदाजीत सतत काहीना काही वेगळं करत असतो. अश्विन एक प्रयोगशील फिरकी गोलंदाज आहे. कधी Action मध्ये थोडा बदल करतो. कधी अचानक थांबतो. कधी फलंदाज चेंडू टाकण्याआधीच क्रीजबाहेर निघाला, तर त्याला रनआऊट करतो. पण आता अश्विनने मैदानात जे केलय, ते कदाचितच कधी क्रिकेटच्या मैदानात घडलं असेल.अश्विनने TNPL मध्ये DRS ला आव्हान देऊन पुन्हा DRS घेतला.

कोइम्बतूर येथे तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये बुधवारी सामना झाला. डिंडिगुल ड्रॅगन्स आणि त्रिचि या दोन टीम्समध्ये लढत झाली. या सामन्यात अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या डिंडिगुलने पहिली गोलंदाजी केली. त्रिचीला 120 धावा या माफक धावसंख्येवर रोखलं. यात अश्विनने महत्वाची भूमिका बजावली.

13 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?

अश्विनने या सामन्यात दोन विकेट घेतले. पण त्याचवेळी असं काही केलं की, सगळेच हैराण झाले. त्रिचीच्या इनिंग दरम्यान 13 व्या ओव्हरमध्ये अश्विन गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या लास्ट बॉलवर त्रिचीचा फलंदाज राजकुमार मोठा शॉट खेळू शकला नाही. त्याच्याविरुद्ध कॅच आऊटच अपील झालं, त्यावेळी अंपायरने आऊट दिलं.

असं अश्विनच करु शकतो

बॅट्समनने DRS घेतला. रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागला नाही, हे स्पष्ट दिसत होतं. बॅट पीचला लागली होती. थर्ड अंपायरने निर्णय बदलला. फलंदाजाला नॉट आऊट दिलं. मैदानावरच्या अंपायरने त्यानंतर निर्णय बदलला. त्यावेळी अश्विनने पुन्हा DRS घेऊन सर्वांनाच चकीत केलं. म्हणजे DRS वर DRS घेण्याचा हा प्रकार होता. (sports news)

अश्विनचा कॉल फेल

अश्विनच्या DRS कॉलवर मैदानी अंपायरने पुन्हा एकदा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवला. थर्ड अंपायरने पुन्हा एकदा रिप्ले पाहिला. त्यांनी आपला नॉट आऊटचा निर्णय कायम ठेवला. अश्विनचा कॉल फेल गेला. त्याला यश मिळालं नाही.

 

अश्विनचे 2 विकेट, डिंडिगुलचा विजय

राजकुमारने त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये अश्विनचा सामना केला. त्याने अश्विनच्या सलग तीन चेंडूंवर एक चौकार आणि दोन सिक्स ठोकले. मात्र, तरीही अश्विनने किफायती गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 26 धावा देऊन 2 विकेट काढले. अश्विनची टीम डिंडिगुलने 6 विकेटने मॅच जिंकून जोरदार सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *