पोस्टात गुंतवणूक करणे फायद्याचे?, ‘या’ योजनांच्या व्याजात वाढ

सरकारने सामान्य नागरिकांना एक चांगली बातमी दिली आहे. आता तुम्ही तुमचा पैसा सुरक्षित गुंवणूक करु शकता आणि चांगले पैसे मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. त्यामुळे तुमच्या पैशाची चांगली बचत होईल. आणि तुमचा बँक बॅलन्सही चांगला वाढेल. पोस्टाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात (interest) बदल करण्यात आला आहे. त्यामुळे याचा लाभ आता ग्राहकांना मिळणार आहे. अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे ठरणार आहे.

सरकारच्या नव्या नियमानुसार आज 1 जुलैपासून ठराविक अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना 0.10 ते 0.30 टक्के अधिक व्याज मिळणार आहे. सरकारने जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीसाठी निर्धारीत केलेल्या व्याजदरांनुसार, पोस्टाच्या विविध मुदतीच्या ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. सलग चौथ्या तिमाहीत केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्यक्त वाढ केली आहे.

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भविष्यनिर्वाह निधी (PPF), मुलींसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि किसान विकास पत्र यावरील व्याजदरात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कोणताही बदल केलेला नाही. मात्र सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर 8 टक्के, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि किसान विकास पत्र यावरील व्याजदर अनुक्रमे 8.2 टक्के आणि 7.5 टक्के तर पीपीएफवर 7.1 टक्के व्याज कायम ठेवण्यात आले आहे.

1 जुलैपासून सुधारित दरांनुसार व्याज

आज शनिवार 1 जुलैपासून लागू होणाऱ्या सुधारित दरांनुसार, पोस्टाच्या एका वर्षांच्या मुदत ठेवींवर आता 6.9 टक्के व्याज मिळणार आहे. त्यावर आधी 6.8 टक्के व्याज मिळत होते. त्याचप्रमाणे दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर आता 6.9 टक्क्यांऐवजी 7 टक्के व्याज मिळणार आहे. तर पाच वर्ष मुदतीच्या आवर्ती ठेवींवरील व्याजदर 0.3 टक्क्यांनी वाढवत 6.5 टक्क्यांवर नेला आहे. दरम्यान, बँकांनी ठेवींवर आकर्षक व्याजदर (interest) देण्यास सुरुवात केली आहे. हे पाहता अपेक्षेप्रमाणे अल्पबचत योजनांवरील व्याजदरातही वाढ करण्यात आलेय.

महिला सन्मान बचतपत्रे आता बँकेतही मिळणार

दरम्यान, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या महिला सन्मान बचतपत्र आता सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि खासगी क्षेत्रातील ठराविक बँकांमध्ये देखील प्राप्त होणार आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सर्व पोस्ट ऑफिस आणि पात्र शेड्यूल्ड बँकांमध्ये देखील उपलब्ध असेल, असे अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलेय. योजनेमध्ये कोणाही महिलेला दोन वर्षांच्या कालावधीसाठी खाते उघडता येईल. तसेच योजनेत किमान गुंतवणुकीची रक्कम 1000 रुपये आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा 2 लाख रुपये आहे, गुंतवणुकीवर 7.5 टक्के दसादशे व्याज तिमाही आधारावर मिळेल. गरजेच्या वेळी खात्यात जमा रकमेच्या 40 टक्के रक्कम काढता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *