साताऱ्यातील घटनेने संताप; महिलेसह अल्पवयीन मुलाला….

(crime news) भरचौकात जातिवाचक शिवीगाळ करून महिलेस (Dalit Women) लाथांनी, उसाच्या व लाकडी दांडक्याने मारहाण करीत विनयभंग केल्याप्रकरणी पानवण (ता. माण) येथील चारपैकी दोन फरारी झालेल्या संशयितांस पोलिसांनी शोधून अखेर अटक केली.

याबाबत म्हसवड पोलिस (Mhaswad Police) ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, पानवण येथील एकाने म्हसवड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. शनिवारी (ता. २६) सकाळी नऊच्या सुमारास पानवण येथील महालक्ष्मी खताच्या दुकानासमोर फिर्यादीची आई जनावरांसाठी कडवळ घेण्यासाठी दिलेले पैसे देवदास रोहिदास नरळे यास परत मागितले.

त्याचा राग मनात धरून देवदास रोहिदास नरळे, पिंटू ऊर्फ शांताराम रोहिदास नरळे, संतोष गोपाळ नरळे, जनाप्पा विठ्ठल शिंदे (सर्व रा. पानवण) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या आईस डोक्याचे केस धरून फरफटत रस्त्यावर आणून मारहाण केली. यावेळी महिलेच्या मुलासही मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केली.

याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात चार जणांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा (Atrocity Act) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोघांना पूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. दोन फरारी संशयितांचा शोध सुरू होता. (crime news)

शोधादरम्यान, पोलिसांनी फरारी असणाऱ्या दोघांना अटक केली. या गुन्ह्यात आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे. दरम्यान, पानवण गावात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *