पाकिस्तानचा कर्णधार बाबरचे भारताविरुद्धच्या सामन्यावर मोठे वक्तव्य
(sports news) आशिया कप 2023 ची सुरुवात पाकिस्तानने विजयाने केली. कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांची शतके आणि दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 131 चेंडूत 214 धावांची विक्रमी भागीदारी. यानंतर गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
पाकिस्तानच्या मोठ्या विजयानंतर कर्णधार बाबर आझमने खेळाडूंचे कौतुक केले आणि भारताविरुद्धच्या सामन्यावरही मोठे वक्तव्य केले.
सामन्यानंतर बाबर म्हणाला, आशिया कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नेपाळवर 238 धावांनी विजय मिळविल्याने शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आमच्या संघाला आत्मविश्वास मिळाला. आम्हाला प्रत्येक सामन्यात 100 टक्के द्यायचे आहे, आशा आहे की आम्ही तिथेही असेच करू.
बाबर पुढे म्हणाला, ‘जेव्हा मी क्रीजवर आलो तेव्हा मला काही चेंडूंची टेस्ट घ्यायची होती. कारण चेंडू वेगाने बॅटीवर येत नव्हता. मी रिझवानसोबत भागीदारी केली आणि त्याचा सामन्यावर परिणाम झाला. मी आणि रिजवान दोघेही एकमेकांना प्रोत्साहन देते होतो. इफ्तिखार आल्यानंतर परिस्थिती बदलली. त्याने खूप चांगली फलंदाजी केली. दोन-तीन चौकार मारल्यानंतर तो लयीत आला. या कामगिरीवर मी समाधानी आहे. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनी त्यांचे काम चोख बजावले.(sports news)
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सहा गड्यांच्या मोबदल्यात 342 धावांची मोठी धावसंख्या उभारली. बाबर आझमने 131 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 151 धावा केल्या. तर इफ्तिखारने 71 चेंडूत नाबाद 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. इफ्तिखारचे हे पहिले एकदिवसीय शतक होते.