KDCC निवडणूक : दिग्गजांना ‘क्रॉस व्होटिंग’ची धास्ती!

 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (KOLHAPUR)शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय असा रंग चढला आहे. शिवसेनेत(SHIVSENA) जिल्हा बँकेच्या निमित्ताने नवा गट निर्माण झाला आहे. भविष्यातील राजकीय वाटचाल आणखी अवघड होऊ नये, यासाठी सत्ताधारी आघाडी शिवसेनेवर जहरी टीका टाळत आहे, तर शिवसेनेने (SHIVSENA) आक्रमक बाणा सोडलेला नाही. सरमिसळ राजकारणामुळे दिग्गजांना क्रॉस व्होटिंगची धास्ती (CROSS VOTING) आहे. यातूनच बँकेच्या निवडणुकीत किमान सहा जागांवर आश्‍चर्यकारक निकाल लागण्याची शक्यता आहे.

वर्षभरापासून जिल्ह्यात विरोधी पक्षाच्या क्षीण झालेल्या ताकदीमुळे एकत्र राहण्यापेक्षा स्वतंत्र राहिल्याने पॉलिटिकल स्पेस पुन्हा मिळवण्याची संधी शिवसेनेने(SHIVSENA) जिल्हा बँकेच्या निमित्ताने हेरली आहे. शिवसेनेचे विधानसभेच्या 10 पैकी सहा जागांवरील उमेदवार निश्‍चित आहेत. विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढावी लागणार असल्यानेच शिवसेना संधी शोधत होती आणि ती संधी बँकेच्या निमित्ताने मिळाली. वाढीव एका जागेच्या वादामुळे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाला. अपक्ष; परंतु शिवबंधनात अडकलेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी खा. निवेदिता माने यांनी मात्र दोन्ही काँग्रेससोबतच बँकेच्या राजकारणात राहणे पसंद केले.

बँकेच्या राजकारणाने पेटून उठलेल्या शिवसेनेने दोन्ही काँग्रेसचे जिल्हा आणि तालुक्यांतील नेते, यड्रावकर आणि माने यांच्यासह भाजपवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील राजकीय पट मांडताना दोन्ही काँग्रेसला शिवसेनेची भविष्यात नक्‍कीच गरज भासणार आहे. त्यामुळेच सेनेवर(SHIVSENA) केलेल्या उपकारांची जाणीव करून देण्यापलीकडे दोन्ही काँग्रेस तुटेपर्यंत ताणणार नाही, हे स्पष्ट आहे. क्रॉस व्होटिंग (CROSS VOTING)करून एकमेकांचे राजकीय उट्टे काढण्याचा कार्यक्रम जोरात होणार
आहे.
शिरोळ तालुका सेवा संस्था गटातील राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर(YADRAVKAR)आणि गणपतराव पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. शेतीमाल प्रक्रिया गटात खा. संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रदीप पाटील-भुयेकर, मदन कारंडे ही दुरंगी लढत शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. बँक, पतसंस्था गटात आ. प्रकाश आवाडे, अनिल पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर असा तिरंगी सामना आहे.

दूध संस्था गटात भैया माने आणि क्रांतिसिंह पवार-पाटील आणि महिला गटातील माजी खा. निवेदिता माने, श्रुतिका काटकर, रेखा कुराडे, लतिका शिंदे, विशेष मागास प्रवर्ग गटातील विश्‍वास जाधव आणि स्मिता गवळी आदी गटांत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग (CROSS VOTING)होण्याची शक्यता असून, धक्‍कादायक निकाल लागेल, असा अंदाज व्यक्‍त केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *