“फायदा मिळू नये यासाठी पवारांनी धनगरांना एन. टी. आरक्षण दिले”
धनगरांना आरक्षणाचा (reservation) फायदा मिळू नये यासाठी शरद पवार यांनीच संविधानात नसलेले एन.टी.आरक्षण धनगरांना दिले. धनगरांचे धनगड करून या समाजाला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली.
धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे सुरू असून पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेव मंदिरात मंगळवारी धनगर जागर यात्रा आली. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी श्री विठ्ठल बिरदेव मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेऊन आ. पडळकर यांनी सभेस सुरुवात केली. यावेळी त्यांनी खा.शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
धनगर आरक्षणाचा (reservation) हक्क आम्ही न्यायालयीन पातळीवर लढतच आहोत. तो लढा आम्ही जिंकून आमचा हक्क मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रात धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र करण्याचे काम सुरू आहे. त्याचा पहिला टप्पा सुरू करत आहोत आणि ही लढाई सर्वांच्या साथीने निश्चित जिंकू. यावेळी धनगर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
एवढा माज कुठून आला?
आ. पडळकर म्हणाले, आपण चौंडीमध्ये अहिल्यादेवींची जयंती साजरी करत असताना कधीही राजकारण मध्ये आणले नाही. पण 83 वर्षांत एकदाही चौंडीत न आलेले शरद पवार दोन वर्षांपूर्वी तिथे अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी आले होते. माझा नातू (आ. रोहित पवार) ज्या मतदारसंघाचा आमदार आहे, त्याच मतदारसंघात अहिल्यादेवींचा जन्म झाला असे त्यांनी सांगितले. अरे एवढा माज कुठून आला? एवढी मस्ती कुठून आली? तुम्ही अहिल्यादेवींपेक्षा तुमच्या नातवाला मोठे समजता का?