कोल्हापूर : ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीवर अत्याचार
(crime news) लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी इम्रानखान शेरखान पठाण (वय २५, रा.जूनी म्हाडा कॉलनी, आर.के.नगर) याला पोलिसांनी अटक केली.
न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवार (ता.२५) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावीस वर्षाची ही तरुणी गेल्या वर्षी कोल्हापुरात आली होती. कामाला जात असताना रस्त्यात तिची इम्रानखान पठाण याच्याशी ओळख झाली. इम्रानखान यानं ओळखीचा गैरफायदा घेऊन तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तिला लग्नाचं आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे मोबाईलवर अश्लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची भीती घालून जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आज इम्रानखानला लक्ष्मीपुरी पोलिसांनी बुधवारी (ता.१८) रात्री अटक कली. (crime news)