काेल्हापूर: रागाच्या भरात मुलाकडून आईची हत्या, कारणंही आलं समाेर
काेल्हापूर जिल्ह्यात मुलाने आईची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना राधानगरी तालुक्यातील बारवाडी गावात घडली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मालुबाई श्रीपती मुसळे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पाेलिसांनी संदीप मुसळे याला अटक केली आहे.
राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पेरणीच्या वादातून संदीप मुसळे याने त्याची आई मालुबाई हिचा डोक्यात खोरे मारून हत्या केली. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करुन कर्मचा-यांना सूचना केल्या.
दरम्यान संदीप मुसळे याला एक मूलगा व एक मूलगी आहे. त्याला दारुचे व्यसन असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये हाेती. राधानगरीचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह पथकाने पंचनामा करुन महिलेचा मृतदेह सोळांकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.