चक्क सुपारीवर कोरली महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे
कसबा बावडा येथील मायक्रो आर्टिस्ट (Micro artist) अशांत मोरे यांनी शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त Navratri festival 2023 नवीन संकल्पना मांडून चक्क सुपारीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे (अंबाबाई, तुळजाभवानी, सप्तश्रृंगी आणि रेणुकामाता) यांचे मायक्रो पेंटिंग करून दर्शन घडविले आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक स्थळांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे लोकांच्या मनात या धार्मिक स्थळांचे स्थान आहे. लोक मोठ्या आशेने आणि श्रद्धेने या धार्मिक स्थळी जाऊन नतमस्तक होत असतात. याच धार्मिक स्थळांपैकी महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठे आहेत – कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि नाशिकची सप्तश्रृंगी ही शक्तिपीठे आहेत. मोरे यांनी ही साडेतीन शक्तिपीठे मायक्रो पेंटिंगच्या (Micro artist) माध्यमातून सुपारीवर अवतरली आहेत.