‘बिद्री’साठी 3 डिसेंबरला मतदान
बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीची (election) रणधुमाळी 26 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 26 पासूनच अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. 25 संचालकांच्या जागांसाठी 3 डिसेंबरला मतदान व 5 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय उपनिबंधक अरुण काकडे काम पाहत आहेत.
सन 2017 मध्ये झालेल्याा निवडणुकीत (election) भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, समरजितसिंह घाटगे, राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांच्या आघाडीने 21 जागा जिंकल्या होत्या. विरोधी आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार दिनकरराव जाधव, संजय घाटगे यांच्या आघाडीला पराभवास सामोरे जावे लागले होते.
इच्छुकांची संख्या मोठी असून, नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार की पुन्हा त्याच संचालकांना संधी मिळणार हे माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.
218 गावांचे कार्यक्षेत्र
‘बिद्री’ चे चार तालुक्यांचे 218 गावांचे कार्यक्षेत्र आहे. त्यासाठी उत्पादक सात गटांतून 20 संचालक व राखीव गटातून 5 असे 25 संचालक निवडले जाणार आहेत. राधानगरी : गट क्र. 1 व 2 मधून प्रत्येक तीन असे 6 संचालक. कागल : गट क्र. 3 व 4 मधून प्रत्येकी तीन असे 6 संचालक भुदरगड : गट क्र. 5 मध्ये 4 व गट क्र. 6 मधून 3 असे 7 संचालक. करवीर : गट क्र. 7 मधून 1 संचालक.
राखीव जागा गट :
अनुसूचित जाती-जमाती : गट क्र. 2 मधून- 1 जागा. महिला राखीव : गट क्र. 3 मधून-2 जागा. इतर मागास : गट क्र. 4 मधून 1 जागा. भटक्या विमुक्त : गट क. 5 मधून 1 जागा.