‘बिद्री’ कारखान्यासाठी उमेदवारी देताना गटनेत्यांची होणार दमछाक
येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (election) बुधवार अखेरच्या दिवशी 125 उमेदवारांनी दुबार 197 अर्ज भरले. एकूण 667 उमेदवारांचे उच्चांकी 862 अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाले आहेत. महिला गटात सर्वाधिक 235 अर्ज आले आहेत, तर सर्वात कमी 27 अर्ज भटक्या विमुक्त जाती गटातून दाखल झाले आहेत. गुरुवारी (दि.2) अर्जांची छाननी होणार आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आपल्या गटाचे स्वतंत्रपणे अर्ज दाखल वेगळी चूल मांडली आहे. चार तालुक्यांतील प्रत्येक गटाच्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केल्यामुळे उमेदवारी देताना गटनेत्यांची दमछाक होणार आहे.
गटनिहाय अर्ज असे (election)
राधानगरी गट क्र. 1 : 72 अर्ज, गट क्र. 2 : 82, कागल गट क्र. 3 : 81, गट क्र. 4 : 48, भुदरगड गट क्र. 5 : 70, गट क्र. 6 : 51, करवीर गट क्र. 7 : 41. महिला राखीव गट : 235 अर्ज. इतर मागास गट :110, अनुसूचित जाती-जमाती गट : 45, भटक्या जाती विमुक्त जाती-जमाती गट : 27.