कला नगरीत रंगणार व्यक्तिचित्रण रेखाटन
कलापंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरमध्ये उद्या (दि.५) रंगणार व्यक्तीचित्रणाचा उपक्रम. रविवारी (दि.५) सकाळी ९ ते दुपारी १ च्या दरम्यान टाऊन हॉल गार्डन, कोल्हापूर येथे हा उपक्रम चालणार आहे. हा उपक्रम (activity) आर्ट सोसायटी ऑफ इंडिया सामाजिक कला संस्थेमार्फत सुरु आहे. कोल्हापुरातील कला रसिकांनी या कला उपक्रमाला भेट घ्यावी असे आव्हान संयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
मुंबईस्थित आर्ट सोसायटी ऑफ इंडिया सामाजिक कला संस्थेमार्फत महाराष्ट्रातील विविध महत्वाच्या शहरां मध्ये स्थळचित्र, व्यक्ती चित्र रेखांकन आणि चित्रांकन करणे सुरू आहे. या अंतर्गत कलापंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये रविवारी (दि.५) सकाळी ९ ते दुपारी १ च्या दरम्यान टाऊन हॉल गार्डन, कोल्हापूर येथे हा उपक्रम (activity) होणार आहे.
हा उपक्रम प्राचार्य जी. एस. माजगावकर, संजय शेलार, कुडल हिरेमठ, निशिकांत पालाडे, राहुल रेपे तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले चित्रकार आणि आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष ज्येष्ठ चित्रकार विजय आचरेकर यांच्या सोबत कोल्हापुरातील चित्रकारांसह हा उपक्रम संपन्न होत आहे. या मध्ये साधारण ५ मॉडेलचे आयोजन केले असून, या मॉडेलचे आपल्या भागातील चित्रकलेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि मान्यवर चित्रकार उत्स्फूर्तपणे स्वतःचे साहित्य आणि इझलसह सहभागी होऊन प्रत्यक्ष व्यक्तिचित्रण करण्यासाठी सहभागी होऊ शकतात.