22 शिक्षकांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण

(crime news) नाशिकमधील राजकारणातून मोठी बातमी आली आहे. शिक्षकांची नियमबाह्य नियुक्ती करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणात तब्बल 106 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था आणि आदिवासी सेवा समिती संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकरींनी या नियुक्तीला नियमबाह्यपणे मान्यता दिली. त्यामुळे शासनाला वेतनापोटी लाखो रुपये द्यावे लागल्याचा आरोप आहे. या प्रकरणात या संस्थांचा तत्कालीन संचालक तथा माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे त्यांची चिंरजीव डॉ.अपूर्व हिरे, अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 106 जणांवर गुन्हा दाखल असून त्यात 22 शिक्षक आहेत. नाशिकचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी ही माहिती दिली.

काय आहे हा प्रकार

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था आणि आदिवासी सेवा समिती या संस्थांमध्ये कर्मचारी भरतीसाठी चुकीच्या महितीच्या आधारे प्रस्ताव तयार केले गेले. या प्रस्तावांना शिक्षणाधिकारी यांनी मंजुरी दिली. शिक्षण उपनिरीक्षक डॉ. किरण कुंवर यांनी तक्रार दिल्यानंतर 106 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात संस्था चालक आणि प्राचार्य यांचाही समावेश आहे.

हिरे कुटुंबियांवर गुन्हा दाखल

शासनाच्या फसवणूक प्रकरणात तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री पुष्पाताई हिरे, उपाध्यक्ष पंडित दगा नेरे, कोषाध्यक्ष स्मिता प्रशांत हिरे, सचिव प्रशांत हिरे, सहसचिव दीपक सूर्यवंशी, सभासद डॉ. अपूर्व प्रशांत हिरे, अद्वय प्रशांत हिरे यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल आहे. पहिला गुन्हा 7 शिक्षक आणि 1 लिपिक, दुसऱ्या गुन्ह्यात 22 शिक्षक 10 लिपिक यांच्यावर आहे. (crime news)

पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते आदेश

हिरे कुटुंबियांच्या असलेल्या या दोन्ही संस्थांमधील भरतीसंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अद्वय हिरे यांनी जानेवारी महिन्यात ठाकरे गटात प्रवेश केला होता. दादा भुसे यांनी ठक्कर देण्यासाठी ठाकरे गटाने त्यांना शिवसेनेत घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *