परिणीती चोप्रा – राघव चड्ढा यांचे Unseen फोटो तुफान व्हायरल
(entertenment news) अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने पती राघव चड्ढा यांच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये दोघे प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
राघव चड्ढा यांचा वाढदिवस असल्यामुळे परिणीती हिने पती सोबत काही खास फोटो पोस्ट केले आहेत. एवढंच नाही तर अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाच्या दिवशी भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
पतीसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘देवाने मला दिलेली सर्वात खास भेटवस्तू म्हणजे तुम्हा आहात. तुमचं मन आणि बुद्धी मला आश्चर्यचकित करते. तुमची मूल्ये, प्रामाणिकपणा आणि विश्वास मला एक चांगला व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करतात.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘कुटुंबाप्रती तुमची बांधिलकी पाहून मला फार चांगलं वाटतं. तुम्ही विचित्र जगाचे जुने सज्जन गृहस्थ आहात. तुमची शांतीच माझं औषध आहे. आज ऑफिशिअली माझ्या आवडतीचा दिवस आहे. कारण आज तुमचा जन्म झाला. वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा…’ (entertenment news)
सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती चोप्रा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. परिणीती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.