बिग बॉस विजेता एल्विशला अटक होताच ‘ती’ मिस्ट्री गर्ल होतेय ट्रेंड? कनेक्शन काय?

(entertenment news) बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता तर, एल्विश याला अटक देखील करण्यात आली आहे. एल्विश यादव याला 14 दिवसांची पोलिस कोठडी ही सुनावण्यात आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एल्विश यादव याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे मिस्ट्री गर्ल सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे. सध्या सोशल मीडियावर जी मिस्ट्री गर्ल ट्रेंड होत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून सोशल मीडिया स्टार अंजली अरोरा आहे.

एल्विश याला अटक झाल्यापासून सोशल मीडियावर अंजली ट्रेंड करत आहे. एल्विश यादव याच्या फोटो आणि व्हिडीओ सोबत अंजली देखील चर्चेत आली आहे. एवढंच नाही तर, एल्विश याच्या अटकेचं कनेक्शन अंजली हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. दरम्यान, एल्विश याला अटक होण्यापूर्वी दोघांमध्ये सोशल मीडियावर वाद रंगला होता.

एक्सवर (ट्विटर) मूनलाइट नावाच्या एका युजरने पोस्ट शेअर करत एक प्रश्न विचारला होता. ‘जर्मनी कडे बीएमडब्ल्यू आहे, इटली कडे फरारी आहे, अमेरिकेकडे टेस्ला आहे, तर भारताकडे काय आहे?’ युजरच्या पोस्टवर उत्तर देत एल्विश म्हणाला, ‘भारताकडे अंजलियन्स आहेत…’

अंजलियन्स म्हणजे भारतात अंजली अरोरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. यावर अंजली म्हणली ‘… आणि एल्विश आर्मी…’ पुढे एल्विश म्हणाला अंजलीने टेकओव्हर केलं आहे. यावर अंजली म्हणाली, ‘मग यावर तर ट्रॉफी द्यायला हवी…’ दोघांमधील हे वाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. (entertenment news)

अंजली अरोरा हिचे एल्विश यादव याच्यावर आरोप?

एल्विश यादव याला अटक केल्यानंतर अंजली हिने एक्सवर एक पोस्ट केली आहे. अंजली म्हणाली, ‘शांती ठेवा सर्वांनी… टीआरपीसाठी काहीही बोलावं लागतं…’ याच कारणामुळे अंजली पुन्हा चर्चेत आली आहे. एल्विश – अंजली यांचे चाहते पोस्टवर कमेंट करत स्वतःची प्रतिक्रिया देत आहेत.

सांगायचं झालं तर, एल्विश याला अटक केल्यानंतर सोशल मीडियावर अंजलियन्स ट्रेंड करत आहे. आता फक्त अंजली, एल्विश याला वाचवू शकते. असं नेटकरी म्हणत आहेत. सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. कोणी म्हणतंय अंजलीच्या चाहत्यांशी पंगा घेऊ नये… तर कोणी म्हणतंय एल्विश आर्मी अंजलीच्या चाहत्यांना कामय लक्षात राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *