सध्या सर्वत्र चर्चा फक्त अंकिता आणि विकी यांच्या नात्याची

(entertenment news) अभिनेता आणि होस्ट सलमान खान याच्या ‘बिग बॉस 17’ मध्ये सतत ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सतत भांडणं, वाद.. यांमुळे चर्चेत असलेल्या बिग बॉसच्या घरात मोठे बदल होणार आहेत. शोमधील सर्व स्पर्धकांचे रुम आता बदलण्यात येणार आहेत. सांगायचं झालं तर, दिवाळी आणि ‘टायगर 3’ सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे बिग बॉसमध्ये एलिमिनेशन झालं नाही. पण आता स्पर्धकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं चित्र दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये सतत खटके उडताना दिसत आहे. बिग बॉसमध्ये विकी आणि अंकिता यांचे रुम देखील बदलणार आहेत.

येत्या एपिसोडमध्ये बिग बॉस अंकिताला म्हणतात, ‘अंकिता… तू इतकी उदास का आहेस? तू ज्याच्यासाठी उदास आहेस, तो बाहेर आनंदात आहे….’ असं म्हणत बिग बॉस अभिनेत्रीच्या जखमांवर मलम लावताना दिसले… अशात अंकिता प्रचंड रागावली. विकी पत्नी अंकिता हिला समजावण्याचा प्रयत्न करताना पुढील एपिसोडमध्ये दिसणार आहे.

संतापली अंकिता लोखंडे

समजावायला आलेल्या विकीला अंकिता म्हणाली, ‘आता हे सगळ काहीही करु नकोस. तू प्रचंड स्वार्थी आहेस. तुझ्यासोबत राहून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आता विसर तू आपलं लग्न झालं आहे. आजपासून आपण वेगळे झालो आहोत. तू फक्त माझा वापर केला आहे. आता तू जा माझ्या समोरुन…’ अंकिता संतापल्यानंतर विकी काय करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता आणि विकी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चे पुढील एपिसोड कसे असतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोशल मीडियावर देखील अंकिता आणि विकी यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. (entertenment news)

‘बिग बॉस’ च्या घरात सतत अंकिता आणि विकी यांची भांडणं होताना दिसतात. सांगायचं झालं तर, अंकिता हिला अनेकदा बिग बॉस शोसाठी ऑफर आली. पण अभिनेत्री कधीही बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय घेतला नाही. आता विकी जैन याला बिग बॉस शोमध्ये यायचं होतं, म्हणून अभिनेत्री पतीसोबत बिग बॉसमध्ये आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *