अंकिता लोखंडे देणार गुड न्यूज? बिग बॉसच्या घरात गोड बातमी?
(entertenment news) ‘बिग बॉस 17’ या लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यामध्ये दररोज भांडणं होताना दिसत आहेत. मात्र यादरम्यान बिग बॉसच्या घरात अंकितासोबत असं काही घडलंय, ज्यामुळे ती चिंताग्रस्त झाली आहे. किचन एरियामध्ये बसलेल्या रिंकू धवन आणि जिग्ना वोरा यांच्याशी बोलताना अंकिता म्हणते की तिला आंबट खाण्याची इच्छा होत आहे. इतकंच नव्हे तर दिवसभर ती किचनमध्ये लोणच्याच्या शोधात असते. त्यामुळे अंकिता लवकरच गुड न्यूज देणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे. रिंकू आणि जिग्नाने जेव्हा अंकिताची आंबट खाण्याची इच्छा ऐकली, तेव्हा तेसुद्धा गुड न्यूजबद्दल बोलतात.
बिग बॉसच्या घरात खरंच आम्हाला गोड बातमी ऐकायला मिळणार का, असं म्हटल्यावर अंकिता रिंकू आणि जिग्नाला म्हणते, “हे या घरात शक्य नाही.” तेव्हा रिंकू तिला म्हणते की, कदाचित शोमध्ये येण्याच्या आधीपासूनच ती गरोदर असू शकते. मात्र याचा विचार करूनच खूप भीती वाटत असल्याचं अंकिता सांगते. या सर्व गोष्टींबद्दल अंकिताने अद्याप विकीसोबत कोणतीच चर्चा केली नाही. या दोघांमध्ये प्रेग्नंसीबद्दल बिग बॉसच्या घरात अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही.
दुसरीकडे रिंकूने अंकिताला म्हटलंय की ती यापुढे तिची अधिक काळजी घेईल. त्यामुळे अंकिता खरंच बिग बॉसच्या घरात प्रेग्नंट आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र जर प्रेग्नंसीची चर्चा खरी ठरली तर अंकिता आणि विकीसमोरील आव्हानं आणखी वाढणार आहेत. पण हे सर्व पब्लिसिटी स्टंट म्हणून केलं असेल तर, अंकिताचे चाहते यावरून नक्कीच नाराज होतील. (entertenment news)
दरम्यान ‘बिग बॉस 17’ हा शो अभिनेत्री अंकिता लोखंडेसाठी फारच त्रासदायक ठरतोय. अंकिताचा पती विकी जैनला नुकतंच ‘दिमाग’ विभागाच्या घरात हलवलं गेलं, तर दुसरीकडे स्वत: अंकिता ‘दिल’ विभागातील घरात राहत आहे. मात्र पतीपासून झालेला हा दुरावा तिला सहन होत नाहीये. अंकिताने विकीसमोर आपल्या मनातील खदखद मोकळेपणे बोलून दाखवली. इतकंच नाही तर तिने हेसुद्धा कबूल केलं की तिने विकीला या शोमध्ये तिच्यासाठी आणि तिच्या खेळीसाठी घेऊन आली आहे. बिग बॉसच्या घरात एकटेपणा जाणवत असल्याची भावना तिने व्यक्त केली.