स्वाभीमानी संघटनेचे ऊस दरासाठी ‘या’ दिवशी चक्काजाम आंदोलन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील हंगामातील चारशे रुपये कारखानदाराकडे अडकले आहेत . ते बुडविण्याचे कारस्थान चालू आहे . त्यासाठी सर्वांनी एक जूट केली आहे पण स्वाभीमानी संघटना शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही . त्यांचे नाक दाबा म्हणजे तोंड उघडेल यासाठी रविवारी ( (दि. १९ नोव्हेंबर ) चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा (warning) स्वाभीमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम चौकात झालेल्या विराट जाहिर सभेत बोलताना दिला .

या सभेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले ‘ मागील हंगामाचे चारशे रुपयाची मागणी संदर्भात व चालू गळीतासाठी ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळण्यासाठी आमचा लढा सुरु आहे . गेल्या गळीत झालेल१५ लाख शेतकऱ्यांच्या ३ कोटी टनाचे १२०० कोटी रुपये कारखानदारांकडे अडकले आहेत ते देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे . लढा पुकारताच वेगवेगळी उत्तरे देवून वेळ मारून नेली जात आहे . चालू गळीत हंगामाचा दर यांनी संगनमताने ठरवून ३१०० रुपये जाहिर केला आहे . हे शेतकऱ्यांच्या हिताविरोधी आहे . शेतकऱ्यांनी घाम गाळून ऊस पिकवायचा आणि डल्ला यांनी मारायचा हे कोणत्या तत्वात बसते . तेंव्हा ऊस दरसाठीची ही लढाई यशस्वी करण्यासाठी कागलकरांनो सज्ज व्हा असे आवाहन करुन श्री शेट्टी म्हणाले , लोकसभा व विधानसभा निवडणूका एकमेकाच्या विरोधात लढणारे शेतकऱ्यांचे पैसे दयायची वेळ आल्यावर तिघे नेते एक होतात . ते शेतकऱ्यांना लूट त आहेत असा आरोप ना .मुश्रीफ , समरजित घाटगे ‘ खासदार संजय मंडलिक यांचे नाव न घेता राजू शेट्टीनी करीत रस्त्यावरून ऊसाचे एकही वाहन सोडायचे नाही असा सज्जड इशाराही (warning) त्यांनी दिला .

यावेळी साभीमानी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले , पालकमंत्र्यांच्या तालुक्यात सत्तेच्या जोरावर शेतकऱ्यावर दरोडयाचे गुन्हे दाखल केले जात आहेत व पोलीस शेतकऱ्यांना लूटणाऱ्यांना सरंक्षण देत आहे, हे चालू द्यायचे नाही . त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे .

सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी सदाशिव भारमल होते . सभेत मारुतराव चौगले , नामदेवराव भराडे , महावीर मगदूम , संपत पाटील ( खेबवडे ) युवा अध्यक्ष शिवाजी कळमकर, परशुराम कदम (मत्तिवडे ), भुदरगड तालुकाध्यक्ष मायकेल बारदेसकर , सचिन खोत ( निपाणी ), भागवत शेटके ( करंजीवणे ) , पांडूरंग आडसूळ ( मळगे खुर्द ) , जोतिराम सुर्यवंशी पाटील ‘ तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली .

स्वागत जगदीश गुरव यांनी केले समाधान हेंदळकर यांनी प्रास्ताविक केले . संदीप भारमल यांनी आभार मानले
कागल चळवळीचं विद्यापीठ !कागलंची राजकिय विद्यापीठ अशी ओळख आहे पण या तालुक्यात शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुध्द लढण्यासाठी व लढा यशस्वी करण्यासाठी या तालुक्यात चळवळ व्हायला पाहिजे व कागल हे चळवळीचं विद्यापीठ आहे अशी नवी ओळख करुन देण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *