रणबीरनं आलिया नव्हे, जगातील ‘या’ सर्वात सुंदर मुलीच्या नावाचा टॅट्टू केला फ्लाँट

(entertenment news) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या ‘अ‍ॅनिमल’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटात एका बाप आणि लेकाची कहानी पाहायला मिळत आहे. सध्या रणबीर त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशात रणबीर आता रश्मिका मंदानासोबत अनस्टॉपेबल वीथ एनबीके या कार्यक्रमात पोहोचला होता. यावेळी रणबीरनं खुलासा केला की त्याच्या मुलीचं म्हणजे राहाच्या नावाचा टॅट्यू त्यानं काढला आहे.

राहा विषयी बोलायचे झाले तर गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये तिचा जन्म झाला. अनस्टॉपेबल वीथ एनबीके या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील एका व्हिडीओत रणबीर बोलताना दिसतो की त्यानं त्याच्या खांद्यावर म्हणजेच कॉल बोनवर राहाच्या नावाचा टॅट्यू काढला आहे. इतकंच नाही तर तो टॅट्यू दाखवताना दिसतो. याशिवाय रणबीरनं खुलासा केला की तो दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा चाहता आहे. इतकंच नाही तर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा विषयी बोलताना म्हणाला की त्यांचा आगामी चित्रपट हा प्रभाससोबतच आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात प्रभाससोबत जर मला छोटी भूमिका मिळाली तरी मला चालेल.

राहाच्या नावाचा टॅट्यू काढण्यााधी रणबीरनं ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी त्याच्या मनगटावर ‘आवारा’ हा टॅट्यू काढला होता. तर 2022 मध्ये मॅशेबलला दिलेल्या मुलाखतीत रणबीरनं खुलासा केला की त्याला टॅट्यू काढायचा होता. त्यानं सांगितलं की आता पर्यंत कोणता नाही. आशा आहे की लवकरच एक टॅट्यू मी काढेन. 8 किंवा काही दुसरं ज्याविषयी मला माहित नाही. असही असू शकतं की माझ्या मुलांच्या नावाचा माझा टॅट्यू असेल किंवा मला माहित नाही.’ दरम्यान, आलिया आणि रणबीरनं अजून राहाचा चेहरा दाखवलेला नाही. (entertenment news)

‘अ‍ॅनिमल’ विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट हिंदीसोबतच तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील मुख्य आकर्षण म्हणजे सिनेमातील भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *