बर्थडे बॉय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनं इतिहास रचला
(sports news) भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात कमाल केली. त्याने फक्त 2.5 षटकात 17 धावा देत आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला. कुलदीपच्या या गोलंदाजीमुळे भारताने टी 20 क्रिकेटमधील आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने तिसरा सामना 106 धावांनी जिंकत मालिका 1 – 1 अशी बरोबरीत सोडवली.
कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 5 विकेट्स घेत इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये निम्मा संघ गारद करण्याची ही कुलदीपची दुसरी वेळ आहे. याचबरोबर भारताकडून टी 20 मध्ये दोनवेळा निम्मा संघ गारद करण्याची किमया करणारा कुलदीप यादव हा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे.
कुलदीप सोबतच भारताचा स्टँड इन कॅप्टन रविंद्र जडेजाने देखील 2 विकेट्स घेतल्या. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्याने रविंद्र जडेजाने आजच्या सामन्यात फिल्डिंग करताना कॅप्टन्सी केली. (sports news)
जडेजा सोबतच अर्शदीप सिंग, मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमारने दमदार शतकी खेळी केली तर यशस्वी जयस्वालने 60 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंहने 10 चेंडूत 14 धावा केल्या.