काय आहे दीपिका पदुकोण हिच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या डाएट चार्ट
(entertenment news) बॉलिवूड अभिनेत्री कशा एवढ्या फिट असतात? त्या स्वतःला कसं फिट ठेवतात? त्यांचा आहार काय असतो? अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अशाच बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे तिच्याबद्दल अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. एवढंच नाही तर, दीपिका हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल देखील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण आता आपण दीपिका हिच्या डाएट आणि फिटनेसबद्दल जाणून घेऊ…
दिवसातून 6 वेळा जेवते दीपिका पादुकोण (Deepika Padukone Diet)
दीपिका पादुकोण हिला वेग-वेगळे पदार्थ खायला प्रचंड आवडतात. अभिनेत्री दिवसातून सहा वेळा जेवते, तरी देखील प्रचंड फिट आहे. त्यासाठी दीपिका स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेते. तर तुम्हाला देखील दीपिका हिच्यासारखं फिट राहायचं असेल तर, दीपिकाचा डाएट प्लॅन आणि फिटनेस रूटीन नक्की फॉलो करा…
ब्रेकफास्ट : फिटनेस फ्रीक दीपिका पदुकोण दिवसातून सहा वेळा जेवते. दिवसातून सहा वेळा अभिनेत्री थोड्या थोड्या प्रमाणात जेवते. अभिनेत्री सकाळी कोमट पाण्यात निंबू मिक्स करुन पिते. त्यानंतर अभिनेत्री 2 इडली किंवा साधा डोसा किंवा उपमासोबत 2 अंडी आणि 2 बदाम घेते. एवढंच नाही तर, अभिनेत्री एक कप दूध देखील पिते.
दुपारचं जेवण : दुपापच्या जेवणात अभिनेत्री घरी बनवलेला पदार्थांनी प्राधान्य देते. दीपिका रोज डाळ, पोळी, भाजी खाते. यासोबत ती दही देखील घेते. सर्व पदार्थ अभिनेत्री मर्यादीत प्रमाणात घेते. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी, दीपिका ताजे रस, नारळाचे पाणी किंवा स्मूदी देखील पिते.
स्नॅक्स : संध्याकाळी नाश्त्यासाठी देखील दीपिका हेल्थी डाएट घेते. बदामसोबतच अभिनेत्री इतर नट्स देखील खाते. शिवाय अभिनेत्रीला फिल्टर कॉफी देखील आवडते. रात्रीच्या जेवणात आभिनेत्री दोन पोळ्या, हिरव्या भाज्या आणि कोशिंबीर घेते, यासोबत ती फळेही खातात. (entertenment news)
ठरलेल्या डाएटसोबत अभिनेत्रीला चॉकलेट खायला देखील प्रचंड आवडतं. शिवाय अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्यासाठी योग आणि व्यायाम देखील करते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम स्वतःचे वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर दीपिका हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.