कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेसच्या फेऱ्या रद्द; काय आहे कारण?
मथुरा (उत्तर प्रदेश) येथे रेल्वे रूळावर तांत्रिक दुरुस्तीचे काम होणार असल्याने येत्या १६ व ३० जानेवारीला दोन दिवस कोल्हापूर ते हसरत निजामुद्दीन एक्स्प्रेस रेल्वेच्या फेऱ्या रद्द (canceled) करण्यात आल्या आहेत.
कोल्हापुरातील शाहू टर्मिनन्सवरून हसरत नजामुद्दीन रेल्वे सुटते. ही रेल्वे कोल्हापूर, पुणे, मनमाड, खांडवा, इटारसी, झांशी, ग्वाल्हेर, मथुरामार्गे आग्रा पुढे हसरत निजामुद्दीन मार्गावर प्रवासी सेवा देते. याच मार्गावरील पलवन व मथुरा येथील रेल्वेरूळात तांत्रिक बिघाड झाला असल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे.
त्यासाठी १६ व ३० जानेवारीला या रेल्वेचा येता-जाताचा प्रवास रद्द (canceled) केला आहे. त्याची माहिती रेल्वेच्या चौकशी कक्षात तसेच वेळापत्रकात देण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरवरून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचा या दोन्ही दिवशीचा प्रवास होऊ शकणार नाही. तरी रेल्वे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.