शिवछत्रपतींचे चरित्र आता ब्रेल लिपीमध्ये
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रमाची गाथा कायमच भारतीयांना प्रेरणा देत आहे. छत्रपती शिवरायांचे कार्य, पराक्रम, विचार, अतुलनीय शौर्य आणि सार्वभौम मराठा साम—ाज्याचा जाज्वल्य इतिहास ब्रेल लिपीच्या माध्यमातून आता दिव्यचक्षूंपर्यंतही (द़ृष्टिहीन) पोहोचणार आहे. शिवरायांचा चरित्र ग्रंथ (Biographical text) ब्रेल लिपीमध्ये तयार होणार असून यासाठी सरकारने 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयीची माहिती दिव्यचक्षूंसाठी उपलब्ध व्हावी या हेतूने ब—ेल लिपीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ग्रंथाची छपाई करण्यात येणार आहे. शिवरायांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सरकारकडून हा विशेष उपक्रम राबवला जात आहे. ब्रेल लिपीमधून दिव्यचक्षूंसाठी शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे शिक्षण सुकर झाले आहे. याच लिपीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र उपलब्ध होणार आहे. ब्रेल लिपीमधील शिवचरित्र ग्रंथ छपाईसाठी 25 लाख रुपयांचा निधी सरकारने दिला आहे.
शिवचरित्र (Biographical text) ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती यापूर्वीच सरकारने स्थापन केली होती. शिवरायांच्या ब—ेल लिपीमधील साहित्यासाठी पुस्तकांची निवड, कार्यकाळ व रूपरेषा ठरवणे, खर्च निश्चित करून पुस्तकांचे वितरणासाठी संस्थेची निवड करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.