काय तुमचं डोकं दुखत आहे, मग आम्ही आहोत ना

आजकाल कुठल्याही वयात डोके दुखीची समस्या अगदी कॉमन झाली आहे. वेगवेगळ्या कारणामुळे तुमचं डोकं दुखू शकतं. विकनेस, टेन्शन, कामाचं प्रेशर अशा कारणांमुळे तुमचं डोक दुखू शकतं. अनेकांचं रोज डोकं दुखतं आणि मग पुढे जाऊन त्यांना माइग्रेनचा त्रास सुरु होतो. एकदा डोक दुखायला सुरुवात झाली की गोळी घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण डोके दुखीसाठी जास्त गोळी घेणे हे आरोग्यासाठी चांगल नाही. पण जर आपण काही घरगुती उपाय वापरले तर आपण या समस्यवर मात करु शकतो. आणि या उपायांमुळे कुठल्या प्रकारचे साइड इफेक्ट्स पण होत नाही. चला तर तुम्हाला आम्ही आज बेस्ट घरगुती उपाय सांगतो.

सिरदर्द का घरेलू उपचार – Headache Relief Tricks

1. मेन्टर प्रेशरला जरा कमी करा
अनेक महिला जुडा किंवा वेणी अतिशय घट्ट घालते. अशावेळी डोक्याचा नसा ओढल्या जातात. त्यामुळे जुडा बांधताना किंवा वेणी घातलताना कायम ती सईल असावी याची काळजी घ्यावी.

2. लाइट कमी ठेवणे

अनेक वेळा तीव्र प्रकाशामुळे डोळांना त्रास होतो आणि मग डोकं दुखू लागतं. अगदी जोरजोरात होणाऱ्या आवाजामुळे ही तुम्हाला डोके दुखीचा त्रास होतो. त्यामुळे कर्कशी आवाजापासून दूर राहा. तुमच्या रुममधील लाइट कमी ठेवा.

3. कोल्ड पॅक वापरा

तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्ही कोल्ड पॅकने शेका. मात्र एक कायम लक्षात ठेवा कुठलीही थंड वस्तू 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका. तसंच तुम्ही अतिशय थंड पाण्याने आंघोळ पण करु शकता. यामुळे तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल.

4. कॉफी

डोक दुखत असल्यास घेणे सगळ्यात चांगलं. कॉफी ही तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होऊ शकते.

5. मसाज

मसाज हा डोक्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय आहे. डोके, कपाळ, मान आणि खांद्याला तेलाने हलक्या हाताने मसाज केल्यास डोके दुखीपासून आराम मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *