निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; राजकीय पक्षांना दणका
राजकीय पक्षांसाठी महत्वाची बातमी. यापुढे आता मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण गुन्हेगारी पार्श्वभूमीवर उमेदवार देताना त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. राजकारणातील गुन्हेगारीकरणाला धक्का देण्यासाठी केंद्रीय निवडणूक (election) आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे.
निवडणूक आयोगाच्या नव्या नियमावलीनुसार आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास त्यामागची कारण द्यावी लागणार आहे. निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर जनतेला समजली पाहिजे, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवाराचं क्राइम रेकॉर्ड जनतेसमोर ठेवावे लागणार आहे. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार न दिल्यास राजकीय पक्षांची मोठी कोंडी होणार आहे. हा राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने दिलेला मोठा दणका आहे.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे की, एखाद्या राजकीय पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर थेट जनतेसमोर त्याचे कारण द्यावे लागेल. हाच उमेदवार का निवडला, हे जनतेला सांगावे लागेल. ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, त्याच्याबाबत मतदारांना संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ही जबाबदारी अर्थातच संबंधित राजकीय पक्षाची राहणार आहे.
निवडणूक (election) आयोगाच्या या निर्णयामुळे आता चांगले उमेदवार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण यापुढे निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या एखाद्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, त्याच्यावर काही गुन्हे दाखल असतील तर त्याचा तपशील वर्तमानपत्र, टीव्ही, संकेतस्थळ अशा माध्यमातून जाहीर करावा लागणार आहे.