‘ही’ युती अभेद्द राहिली तर जिल्हयाच्या राजकारणाला भूकंपांचा हादरा

(political news) तब्बल तीस वर्षानंतर निवडणूक लागलेल्या वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाडीक, कोरे, आवाडे गटाने दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी महत्वाची भूमिका घेतल्याने पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणात नायक बनले आहेत. (महाडीक, आवाडे, कोरे युती)

दरम्यान, या निकालानंतर महाडिक, कोरे, आवाडे एकत्र राहिले तर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगली दिशा मिळू शकते. सन २००४ सालच्या हातकणंगले विधानसभेवर जनसुराज्य शक्ती पक्षाचा झेंडा होता. दरम्यान, आमदार राजीव आवळे यांच्या पराभव झाला. हा पराभव पक्षाचे अध्यक्ष डॉ कोरे यांच्या जिव्हारी लागला.

वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा जनसुराज्य शक्ती पक्षाला हातकणंगले विधानसभेत गत वैभव आणण्यासाठी डॉ. कोरे यांनी हाडवैर असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडीक, आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी युती केली.(political news)

दरम्यान, कोरे यांनी समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव महाआघाडी आघाडी पुढे ठेवला होता. महाआघाडी कडून प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय आमदार महाडीक यांनी युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवून आघाडीला विजयाचे श्रेय द्यायचे नव्हते.

महाडीक, आवाडे, कोरे युती : राजाराम कारखान्यात युती पक्की
या निमित्याने महाडीक गट मजबूत करण्याची व आगामी छत्रपती राजाराम साखर कारखान्याची निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांचा उधळलेला वारू रोखण्यासाठी रणनीती आखली आहे. आवाडे गटातून राहुल आवाडे यांना लोकसभा लढण्यासाठी तयारी करण्याचा विचार पक्का ठेवून महाडीक,आवाडे,कोरे यांची युती पक्की झाल्याचे बोलले जाते.

पुढील निवडणुकीचे स्वप्न साकार करण्यासाठी वडगाव बाजार समितीच्या विजयाचा निकाल तीन नेत्यांचे स्वप्न साकार करणार हे येणारा काळ ठरविणार आहे. विद्यमान आमदार राजू आवळे यांनी काँग्रेस पक्षाचा गड मजबूत करण्यासठी समितीची निवडणूक लढवली आहे.या निवडणुकीत काँग्रेस पक्षांसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आम, आवळे यांनी आपल्या तब्बूत सामील केल्याने आगामी काळात आघाडीची ताकद वाढली आहे.

सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेत सामील करण्याच्या वृत्तीने आम.आवळे यांची जनमानसात इमेज सुधारली आहे. समितीच्या निवडणूकीत महाडीक, आवाडे, कोरे या मातब्बर नेत्यां विरुद्ध आम.आवळे यांनी एकाकी झुंज देऊन हम किससे कम नही हे सिद्ध करून दाखविले आहे.निवडणुकीत आघाडीला मिळालेले मतदान युतीला विचार करायला लावणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *