कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक!

 

कोल्हापूर  (kolhapur)जिल्ह्याचे अनेक प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वैयक्तिक पातळीवर अनेकांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, लोकप्रतिनिधींसाठी प्रश्नांची, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आयुध म्हणून ज्याकडे पाहिले जाते, त्या विधिमंडळात कोल्हापूरच्या (kolhapur) प्रश्नांसाठी आवाज घुमणार कधी? असा सवाल कोल्हापूरकरांतून उपस्थित होत आहे.

सर्वसामान्यांच्या अनेक प्रश्नांना विधिमंडळात वाचा फुटते. त्यावर निर्णय होतो, अनेकदा अन्य पाठपुराव्यांच्या पद्धतीपेक्षा अधिवेशनात मांडलेल्या समस्या मार्गी लागण्याची शक्यता अधिक असते. यासह तो प्रश्न संपूर्ण राज्यभर जातो, त्याचे महत्त्व, त्याचे गांभीर्य समजते. सभागृहात झालेल्या चर्चेला, निर्णयाला वैधानिक, कायदेशीर अधिष्ठान असते.यामुळेच स्थानिक प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा आटापिटा सुरू असतो. जिल्ह्याच्याही अनेक समस्या आहेत, प्रश्न आहेत. अशा समस्या, प्रश्न अधिवेशनात येतील, त्यावर चर्चा होईल, काही निर्णय होईल, अशी अपेक्षा कोल्हापूरवासीयांची (kolhapur)होती.

चाळीस वर्षांपासूनचा खंडपीठाचा प्रश्न

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, याकरिता गेल्या 40 वर्षांपासूनचा लढा सुरू आहे. आंदोलने, निवेदन, बैठका या पातळीवर त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी खंडपीठाचा प्रश्न विधिमंडळात (legislature) चर्चिला गेला होता. कोरोनामुळे गेली दोन वर्षे स्थगित असलेले आंदोलन पुन्हा सुरू झाले आहे. आंदोलक सक्रिय झाले आहेत. खंडपीठाचा प्रश्न तडीस जाणे आवश्यक आहे.

कोल्हापूर पोलिस आयुक्तालयाची प्रतीक्षा

कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय व्हावे, अशी मागणी आहे. तसा प्रस्ताव सादर झाला होता. हा प्रश्नही कधी काळी विधिमंडळात आला होता. त्यावर चर्चाही झाली होती. दरम्यान, कोल्हापूर (kolhapur) मागे पडले आणि पिंपरी-चिंचवड, अकोला या ठिकाणी आयुक्तालये झाली. अन्य ठिकाणी झाली, त्याबाबत काहीच म्हणणे नाही; पण कोल्हापूरला (kolhapur)का नाही, असा सवाल आहे. या प्रश्नावर चर्चा होऊन निर्णय होणे आवश्यक आहे.

शाहू मिल परिसरात आंतरराष्ट्रीय शाहू स्मारक कधी

शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे; पण हे स्मारक उभारणार कधी, असा प्रश्न आहे. त्यासाठी आराखड्याचे सादरीकरण झाले. मात्र, कायदेशीर बाबींमुळे या स्मारक उभारणीच्या प्रक्रियेला गती काय येईना. हा प्रश्न विधिमंडळात चर्चिला गेला, तर किमान कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी तरी हालचाली होतील. पाठपुराव्याला वेग येईल.

तीर्थक्षेत्र विकास आराखडा

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या निधीचा प्रश्न आहे. पहिल्या टप्प्यात पार्किंगचे काम सुरू झाले आहे. मात्र, पुढील टप्प्याला गती येण्यासाठी, निधी उपलब्ध होण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा प्रश्न विधिमंडळात आला तर निधी आणि अन्य कामांची गती अधिक वेग पकडेल अशी शक्यता आहे. यापूर्वी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा प्रश्न विधानसभेत घुमला होता.

पूरग्रस्तांना भरपाई; जिल्ह्याचा विकास

जिल्ह्याला 2019 आणि 2021 या दोन वर्षांत महापुराचा मोठा फटका बसला. कोल्हापूरच्या (kolhapur)विकासावर यामुळे मोठा परिणाम झाला आहे. 2021 च्या महापुराच्या भरपाईचा प्रश्न आहे. दुकानदारांना बदललेल्या अटींमुळेही भरपाई मिळवण्यास अडचणी आहेत. याबाबत अनेक प्रश्न आहेत. कोल्हापूरचे दोनवेळा बसलेल्या महापुराच्या फटक्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पाठपुराव्यांची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *