साखरपुड्यात शहनाज गिल ‘सैराट..’ नेटकरी म्हणतात,’सिद्धार्थला इतक्यातच विसरलीस?’

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर अभिनेत्री शहनाज गिल प्रचंड धक्यात होती. या सगळ्या धक्यातून सावरण्याकरता तिने स्वतःला वेळ दिला होता. मात्र आता हळूहळू शहनाज आपलं खासगी आयुष्य पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

अभिनेत्री शहनाज गिल हल्लीच मॅनेजरच्या साखरपुड्यात स्पॉट झाली. या कार्यक्रमात शहनाजने मराठीतील लोकप्रिय ठरलेला सिनेमा ‘सैराट’वर परफॉर्म केलं आहे. मात्र शहनाजचं असं आनंदी राहणं आसिम रियाजला पसंद आलेलं नाही. आसिमने शहनाजला चांगलच ट्रोल केलंय. सिद्धार्थच्या जाण्यानंतर ती या सगळ्यापासून दूर झाली होती.

मात्र आता तिचा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यावर बिग बॉस 13 मधील स्पर्धक आसिम रियाजने मस्करी केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच ट्रोल झाला आहे. शहनाज गिल टीव्ही सेलेब्सच्या मॅनेजरच्या एंगेजमेंट फंक्शनला पोहोचली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. एंगेजमेंट पार्टीत शहनाज गिलनेही जबरदस्त डान्स केला.
शहनाजचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैराट चित्रपटातील झिंगाट या गाण्यावर ती जबरदस्त डान्स करत आहे. या पार्टीत शहनाज तिच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत आहे.

शहनाजच्या चेहऱ्यावरही हसू दिसत होतं. हा व्हिडिओ पाहून Sidnaaz चे चाहते (सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल) खूप खुश आहेत.
सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनानंतर शहनाज गिलने एका व्हिडिओ गाण्याच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘तू यही ही है’ असे या गाण्याचे नाव आहे. यामध्ये सिद्धार्थ आणि शहनाजच्या काही व्हिडिओ क्लिपिंग्जचा वापर करून सादर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *