‘ही तर नोरा फतेहीलासुद्धा टाकणार मागे’

(entertenment news) बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगन एक फेमस स्टारकिड आहे. ती सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकताच ती मुंबईमध्ये आपल्या एका मित्रासोबत दिसून आली. त्यांनतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

न्यासा देवगन नुकताच आपल्या एका मित्रासोबत बांद्रामधील एका रेस्टोरंटमध्ये दिसून आली. यावेळी डिनर करून बाहेर पडताना तिला पापाराझींनी आपल्या कॅमेरात कैद केलं. सेलेब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने न्यासाचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

यावेळी न्यासा पापाराझींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. हे फोटो आणि व्हिडीओ समोर येताच तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. (entertenment news)

काजोल आणि अजयच्या लेकीचा हा ऍटिट्यूड चाहत्यांना अजिबात रुचलेला दिसत नाहीय. युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट करून न्यासाची शाळा घेत आहेत.

तर काहींनी तिला तिच्या ड्रेसवरून ट्रोल केलं आहे. ही पहिली वेळ नाही जेव्हा न्यासा आपल्या ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे. याआधीही ती आपल्या फॅशन स्नेन्समुळे ट्रोल झाली आहे.

यावेळी न्यासाने व्हाईट कलरचा शॉर्ट ड्रेस घातला होता. न्यासाला या ड्रेसमध्ये पाहून युजर्सनी कमेंट करत म्हटलं आहे, ‘ही तर नोरा फतेहीलाही मागे टाकणार’. न्यासा आता फक्त १८ वर्षांची आहे. परंतु ती एक फेमस स्टारकिड आहे. न्यासा सध्या स्वित्झर्लंडमध्ये शिकत आहे. न्यासाने मुंबईमध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनतर ३ वर्षे तिनं सिंगापूरमध्ये शिक्षण घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *