‘वीर’ चित्रपटाचे निर्माते विजय गलानी यांचे निधन
बॉलिवूड चित्रपट निर्माते विजय गलानी यांचे बुधवारी निधन झाले. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, विजय गलानी यांचा मृत्यू लंडनमध्ये झाला. कर्करोगाच्या उपचारासाठी ते काही दिवसांपूर्वीच लंडनला गेले गेले होते.विजय यांनी २०१० मध्ये वीर चित्रपटाची निर्मिती केली होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने वीर चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. सलमान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली होती.विजय यांनी ‘सूर्यवंशी’ (१९९२) आणि ‘अचानक’ (१९९८), अजनबी (२००१) या चित्रपटांसह अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली.
विजय यांचा ‘पॉवर’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. यामध्ये श्रुती हासन, विद्युत जामवाल आणि प्रतीक बब्बर यांच्या भूमिका होत्या.
विजय यांच्या निधनानंतर निर्माते रमेश तौरानी यांनी त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलंय- दुर्दैवी आणि दु:खद, माझ्या प्रेमळ मित्रा विजय गलानी आता आमच्यामध्ये राहिले नाही. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांना सांत्वना ओम शांती.