कोरोनामुळे लग्न रद्द झालं तर मिळणार 10 लाख रुपये
जगभरात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत आहे. अगदी संपूर्ण देशात लॉकडाऊन करावा लागणार अशी वेळ आली आहे. नागरिक कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहे. मुंबईत कोरोनाची तिसरी लहर आल्याचं देखील महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने म्हटलं आहे.
कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यानंतर आता कुठे सामान्यांच जीवन पुर्वपदावर येत होतं. तेवढ्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रवेश केला. यामुळे लग्न, समारंभ सारखे अनेक योजना रद्द कराव्या लागल्या.
असं असताना आता पुन्हा तिसऱ्या कोरोनाच्या लाटेने डोकं वर केलं आहे. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकार देखील कठोर पावलं उचलत आहे. कोरोनाला घेऊन राजाधानी दिल्लीत यलो अलर्ट जाहीर केलं आहे. ज्यामुळे दिल्लीत लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात 20 हून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. अशावेळी ज्या लोकांनी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आपल्या लग्नाचं बुकिंग केलंय. त्या लोकांच्या टेंशनमध्ये वाढ झाली आहे. अनेकांनी तर आपलं लग्न देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.तुम्ही देखील असा निर्णय घेतला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कोरोनामुळे जर तुम्ही तुमचं लग्न रद्द केलं असेल तर तुम्हाला 10 लाख रुपयाचा फायदा होणार आहे. महत्वाचं म्हणजे तुमचा याकरता एकही रुपया खर्च होणार नाही.
वेडिंग इन्श्युरन्स अत्यंत महत्वाचं
कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता, नवीन नियमांमुळे या वर्षीही अनेक विवाह रद्द होऊ शकतात. त्याचबरोबर बँक्वेट हॉल, मॅरेज हॉल, फार्म हाऊस आदींचे बुकिंग लाखोंमध्ये होते. अशा परिस्थितीत अनेकवेळा हे लोक बुकिंग रद्द करून पैसे परत करण्यास नकार देतात. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशातील अनेक कंपन्या तुम्हाला लग्नाचा विमा देतात.
देशातील अनेक कंपन्या लग्नाकरता इंश्युरन्स देखील देतात. तुमचं लग्न रद्द झाल्यापासून ते अगदी दागिने चोरी जाईपर्यंत हा विमा काम करतो.
कसा मिळणार लाभ
जर तुम्ही लग्नाचा इन्श्युरन्स काढलं असेल तर तुमचं नुकसान होणार नाही. इन्श्युरन्स कंपनी सुरूवातीपासून पॅकेज तयार करून ठेवते. तर अनेक कंपन्या गरजेनुसार पॅकेज तयार करतात.
यावर मिळणार इन्श्युरन्स
कॅटररला दिलेल्या आगाऊ रक्कमेवर
बुक केलेल्या कोणत्याही हॉल किंवा रिसॉर्टला दिलेले आगाऊ रक्कम
ट्रॅव्हल्स एजन्सीला दिलेली आगाऊ रक्कम
लग्नाच्या पत्रिकेकरता झालेला खर्च
डेकोरेशनकरता दिलेले आगाऊ पैसे
लग्नाच्या वेन्यूसेटवर आगाऊ पैसे
विमा मिळण्याची पद्धत
विमा घेण्यापूर्वी, तुम्हाला लग्नाच्या खर्चाची सर्व माहिती विमा एजन्सीला द्यावी लागेल.
तुमचे नुकसान होताच लगेच तुमच्या विमा कंपनीला कळवा.
यानंतर, जर तुमची कोणतीही वस्तू चोरीला गेली असेल, तर त्याची माहिती पोलिसांना द्या आणि एफआयआरची प्रत विमा कंपनीकडे द्या.
दावा करण्यासाठी फॉर्म भरा, कंपनीसोबत सर्व कागदपत्रे जमा करा.
तुमची विमा कंपनी तपासासाठी प्रतिनिधी पाठवून सर्व माहिती घेईल, त्यानंतरच दावा केलेले पैसे परत केले जातील.
जर तुम्ही केलेला दावा खरा ठरला, तर विमा कंपनी नुकसानीची पूर्ण भरपाई करेल.
खोटे असल्यास, दावा नाकारला जाईल.
विमा कंपनी ही रक्कम थेट लग्नाच्या ठिकाणी किंवा विक्रेत्याला देऊ शकते.
– जर कोणत्याही प्रकारे पॉलिसीधारक दावा केलेल्या रकमेवर खूश नसेल, तर तो थेट न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडू शकतो.
कोणत्याही परिस्थितीत, विवाह विम्याचा दावा अपघातानंतर 30 दिवसांच्या आत निकाली काढला जातो.