कोल्हापुरातील महिलेने नवऱ्याचा मृतदेह नाकारला

सुशिक्षित, घरंदाज व्‍यक्‍तीवर अखेरच्‍या क्षणी मिळेल ती मोलमजूरीची कामे करण्‍याची वेळ आली. एक महिन्‍या सरकारी रुग्‍णालयात बेवारस म्‍हणून उपचार घेताना त्‍यांचा मृत्‍यू झाला. पोलिसांनी त्‍याच्‍या पत्‍नीला घेवून पतीच्‍या मृत्‍यूची माहिती दिल्‍यानंतर तिने मृतदेह ताब्‍यात घेण्‍यास नकार दिला. एक शासकीय नोकरदार म्‍हणून सेवानिवृत्त झालेल्‍या या पत्‍नीच्‍या नकाराने पोलिसही अवाक झाले. अखेर मृताच्‍या भावाने मृतदेहा ताब्‍यात घेवून त्‍याच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार केले. आयुष्‍यभराची साथीदार म्‍हणून जिची साथ हवी होती तिने अंत्‍यसंस्‍कारावेळीही त्‍याची साथ न दिल्‍याचे हे उदाहरण सुन्‍न करणारे आहे.सीपीआरमध्‍ये महिन्‍याभरापासून उपचार घेणार्‍या व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाल्‍याने पोलिसांनी नातेवाईकांचा शोध सुरु केला. या व्‍यक्‍तीला उपचाराला दाखल करणार्‍या व्‍यक्‍तीकडून माहिती घेण्‍यासाठी पोलिस रात्रभर फोन करत होते. परंतु त्‍यावरील रिजार्च संपल्‍याने फोन लागत नसल्‍याचे समजले. यामुळे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तारळेकर यांनी आपले मोबाईल वरून त्या व्यक्तीचे फोनवर रिचार्ज मारला यानंतर फोन लागला. त्‍या व्‍यक्‍तीने मृत व्‍यक्‍तीहा त्‍याच्‍यासोबत केवळ काम करत असल्‍याचे सांगितले.मृत व्‍यक्‍ती राजारामपुरीतील एका कॉन्‍ट्रॅक्‍टरकडे काही दिवसांपुर्वी काम करत होता अशी माहिती सहायक फौजदार राजेंद्र कलगुटकर यांना मिळाली. त्‍यांनी थेट या कॉन्‍ट्रॅक्‍टरची भेट घेतली. मृत व्‍यक्‍ती ही राजारामपुरीतील राहणारी असून त्‍याची पत्‍नी निवृत्त शासकीय नोकरदार असल्‍याची माहितीही पुढे आली.पोलिसांनी माहिती घेवून मृताच्‍या पत्‍नीचा शोध घेतला. तिला याची माहिती दिल्‍यानंतर तिने मृतदेह ताब्‍यात घेण्‍यास साफ नकार दिला. तिच्‍या या उत्तराने पोलिसही अवाक झाले. याची माहिती पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे यांना देण्‍यात आली. त्‍यांनी मृताच्‍या भावाकडे विचारणा केली असता त्‍याने मृतदेह ताब्‍यात घेवून अंत्‍यसंस्‍कार करण्‍यास होकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *