आता कोल्हापुरात ‘नो एन्ट्री’

कर्नाटकातून शाहू गूळ मार्केट यार्डात होणारी गूळ (jaggery) आवक बंद करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने सोमवारी घेतला. यामुळे कोल्हापूरच्या नावे कर्नाटकचा गूळ ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार बंद होणार आहेत.

कर्नाटकातून गूळ ( कर्नाटक गूळ )आणून तो कोल्हापुरी गूळ म्हणून विक्री केला जात होता. त्याचा फटका येथील शेतकर्‍यांना बसत आहे, त्यामुळे ही आवक थांबवावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली होती. त्यावर कर्नाटकच्या गुळाची आवक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील यांनी दिली.

सांगली, कराड महालिंगपूर, नीरा, पुणे, सोलापूर, लातूर या बाजार समित्यांच्या गुळाला कोल्हापुरी गूळ (jaggery) असे संबोधल्यास अथवा राजर्षी शाहू महाराजांच्या फोटोचा वापर अडते, व्यापार्‍यांनी केल्यास त्यांच्यावर समितीतर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखी कळविले असल्याचे सचिव जयवंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, बंदी आदेश झुगारत एखाद्या व्यापार्‍याने कर्नाटकी गूळ कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणून तो कोल्हापुरी गूळ या नावाने विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा गूळ व्यापार्‍यांना दिला आहे.

यावेळी समितीचे उपसचिव के. बी. पाटील, गूळ उत्पादक शेतकरी अजित पाटील, अमित केंबळे, सागर देसाई, धनाजी पाटील, शैलेश लाड, विशाल पाटील, रणजित लाड, दीपक पाटील यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

नावलौकिकाला धक्का लावू देणार नाही ( कर्नाटक गूळ )

कर्नाटकातील भरमसाट साखरमिश्रित गूळ येथे आणून तो कोल्हापुरी गूळ म्हणून विक्री केल्याने त्याचा फटका येथील शेतकर्‍यांना बसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कष्ट करून गूळ उत्पादन घेतले, या गुळाचा जगात लौकिक निर्माण केला. या लौकिकाला धक्का लावू देणार नाही. संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *