पुढच्या मॅचमध्ये या क्रिकेटपटूला स्थान नाही?

(sports news) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कसोटी सीरिज सुरू आहे. गुरुवारी टीम इंडियाने जिंकण्याची संधी गमावली. त्यामुळे तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने, तर दुसऱ्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. दुसऱ्या कसोटीमध्ये पावसाचाही व्यत्यय होता.

तिसरा कसोटी सामना 11 ते 15 जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. एकीकडे विराट कोहली तिसऱ्या कसोटीमध्ये खेळणार की नाही अशी टांगती तलवार आहे. तर दुसरीकडे आता संघातील खेळाडूवर कोच राहुल द्रविड नाराज आहेत. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे.

या खेळाडूवर कोच राहुल द्रविड खूप नाराज

दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 60-70 धावा कमी केल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यात रिषभ पंतचा फॉर्म अत्यंत वाईट होता. त्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे. रिषभ पंत पहिल्या डावात 17 धावा आणि दुसऱ्या डावात शून्य धावा करून बाद झाला. रिषभवर सर्वजण नाराज आहेत.

राहुल द्रविड काय म्हणाले?
‘पंतने थोडा वेळ घ्यायला हवा होता. कधी आक्रमकपणे खेळायचे तर कधी कठीण प्रसंगांवर मात करायची हे ठरवण्याची एक वेळ असते. पंतने सुरुवातीला क्रीजवर राहून स्वत:ला वेळ द्यायला हवा होता.

ऋषभ पंतला कोणीही सांगणार नाही की त्याने आक्रमक खेळ करू नये. काहीवेळा आक्रमकपणे खेळण्यासाठी योग्य वेळ निवडणं आवश्यक असतं. पण ते त्याने केलं नाही त्याचे परिणाम काय झाले हे आपल्याला कळलं, असं टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड बोलताना म्हणाले.

पंत असा एक खेळाडू आहे जो क्रिझवर वेळ घेऊन टिकला तर तो संपूर्ण सामना बदलवू शकतो. त्याच्याकडे ते कौशल्य आहे. मात्र प्रत्येकवेळी आक्रमकपणे खेळून काय होतं ते पाहायला मिळालं. केव्हा आक्रमक व्हायचं आणि केव्हा शांतपणे खेळायचं हे समजून खेळणं कठीण असतं. ते पंतने आत्मसात करायला हवं. (sports news)

पंत अजून शिकतोय तो आणखी चांगलं करू शकतो असा विश्वासही द्रविड यांनी व्यक्त केला. पंतच्या कामगिरीवरून त्याला चाहते आणि काही दिग्गज लोक ट्रोल करत आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यात आता पंतचं संघातील स्थान त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे डळमळीत होणार की राहणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *